Posts

Showing posts from 2016

माझे सळसळते रक्त विचारते तेव्हा...

सळसळते रक्त जेव्हा विचारते मला.... सहज मनाशीच विचार करत बसलो असताना नसानसात सळसळ करणाऱ्या सळसळत्या रक्तानंच एकेदिवशी मला  प्रश्न विचारला की "धनगर समाज एवढा षंढ कसा काय झालाय??" शाॅकत बसला राव, अचानक या विचारलेल्या प्रश्नामुळे आसपासचे वातावरणही गंभीर झाल्याचे जाणवले, सगळीकडे निरव शांतता पसरलेली होती, डोक्यात विचाराची चक्रं सुरू झाली, रक्तवाहिण्या पहिल्यापेक्षाही जलद गतीने रक्ताचा पुरवठा करण्यासाठी धावू लागल्या, या एकाच प्रश्नामुळे लाखो विचारांचा अक्षरशा आगडोंब उसळला, एकामागून एक अशा विचारांनी थैमान घातले मग पाठीमागे इतिहासांत डोकावून पाहिलं तेव्हा "एवढं आम्ही षंढ कसे काय झालोय?" याची मला स्वतःलाच लाज वाटायला लागली. अरे एकेकाळी राजा समाजात जन्माला आलेल्या आम्ही औलादी आज नक्की कोणतं गुलामगीरीतलं जगणं जगतोय तेच आम्हाला कळत नाही आणि कळलं तर वळत नाही ही सर्वात मोठी शोकांतिका. धनगर पुत्र आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्य चे आम्ही वारसदार, आशिया खंडावर प्रभुत्व गाजवणाऱ्या राजा सम्राट अशोकाच्या तलवारीची आम्ही तळपती धार, अटकेपार झेंडे फडकवणाऱ्या श्रीमंत मल्हारराव होळकरांचे मावळे...

सळसळते रक्त जेव्हा विचारते मला...

Image
सळसळते रक्त जेव्हा विचारते मला.... सहज मनाशीच विचार करत बसलो असताना नसानसात सळसळ करणाऱ्या सळसळत्या रक्तानंच एकेदिवशी मला  प्रश्न विचारला की "धनगर समाज एवढा षंढ कसा काय झालाय??" शाॅकच बसला राव, अचानक या विचारलेल्या प्रश्नामुळे आसपासचे वातावरणही गंभीर झाल्याचे जाणवले, सगळीकडे निरव शांतता पसरलेली होती, डोक्यात विचाराची चक्रं सुरू झाली, रक्तवाहिण्या पहिल्यापेक्षाही जलद गतीने रक्ताचा पुरवठा करण्यासाठी धावू लागल्या, या एकाच प्रश्नामुळे लाखो विचारांचा अक्षरशा आगडोंब उसळला, एकामागून एक अशा विचारांनी थैमान घातले मग पाठीमागे इतिहासांत डोकावून पाहिलं तेव्हा "एवढं आम्ही षंढ कसे काय झालोय?" याची मला स्वतःलाच लाज वाटायला लागली. अरे एकेकाळी राजा समाजात जन्माला आलेल्या आम्ही औलादी आज नक्की कोणतं गुलामगीरीतलं जगणं जगतोय तेच आम्हाला कळत नाही आणि कळलं तर वळत नाही ही सर्वात मोठी शोकांतिका. धनगर पुत्र आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्य चे आम्ही वारसदार, आशिया खंडावर प्रभुत्व गाजवणाऱ्या राजा सम्राट अशोकाच्या तलवारीची आम्ही तळपती धार, अटकेपार झेंडे फडकवणाऱ्या श्रीमंत मल्हारराव होळकरांचे मा...

अहिल्याईंच्या प्रशासनाचा अवलंब करा...

माता अहिल्ये तुझी जगभर कीर्ती तूच होतीस महान प्रशासनकर्ती माते तुझी घेऊनिया स्फूर्ति लढण्यासाठी घेऊन तलवार हाती आम्हीही उतरतो आता रणांगणावरती..... एक स्त्री असूनदेखिल या देशाच्या विशाल भूभागावर जवळजवळ २८ वर्ष राज्यकारभार करणारी राज्यकर्ती, १८व्या शतकातील एक आदर्श आणि महान प्रशासक असा उल्लेख अक्षरशा ब्रिटिशांनी करून ठेवला आहे. पण आम्ही अजूनही अंधारातच आहोत. आपल्या राज्यातील प्रजेलाच नव्हे तर अखंड भारतातील प्रजेला पोटच्या लेकरांप्रमाने सांभाळणारी मायमाऊली, एवढेच नव्हे तर जाती-धर्माच्या भींती तोडून स्वताच्या मुलीचा आंतरजातीय विवाह करून समाजासमोर आदर्श ठेवणारी थोर समाजसुधारक, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मंदिरांचा जिर्णोध्दार, मंदिरांचे बांधकाम, मश्चिदींचे बांधकाम, शेतकऱ्यांसाठी शेततळे, तलाव, विहीरी, वाटसरूंसाठी बारवे, धर्मशाला, नदीवरील घाट अशी कीतीतरी विकासकामे प्रजेच्या हीतासाठी करणारी पुण्यश्लोक, वेळप्रसंगी प्रजेच्या रक्षणासाठी हाती तलवार भाले घेऊन दुश्मनांच्या चिंधड्या उडवणारी रणरागीणी, राजमाता, महाराणी, लोककल्याणकारी माता अहिल्याई होळकर यांची आज २९१ वी जयंती त्यानिमीत्त माझ्या रा...