Posts

Showing posts from July, 2017

आज वाढदिवस माझ्या लाडक्या भावाचा...💐

Image
आमचे धाकले बंधू युवकांचे धडाकेबाज नेतृत्व, युवा लेखक, समाजासाठी झटणारे झगडणारे संघर्षात्मक नेतृत्व यशवंत युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख मा.उमेशराजे अनुसे या माझ्या लाडक्या भावाचा आज जन्मदिवस त्यानिमीत्ताने... शिखरे उत्कर्षाची तु सर करीत रहावी..... ! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी... ......! "तुझ्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे........ ! तुझ्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे.....! ...तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा..... ..! वाढदिवसाच्या तुला हर्दिक हर्दिक शुभेच्छा।। जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥ 💐💐💐💐💐💐💐💐💐 शुभेच्छूक,      *✍️नितीनराजे अनुसे✍️* अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली          +९१७६६६९९४१२३ nitinrajepublications.blogspot.com

समाजाच्या न्याय व हक्कासाठीच यशवंत युवा सेना : शरद गोयेकर (टिंग्या)

Image
समाजाच्या न्याय व हक्कासाठीच यशवंत युवा सेना ही एकमेव क्रांतीकारी संघटना झटत व झगडत असून अन्याय व अत्याचाराच्या विरोधात असूड भिरकवण्यासाठीच या संघटनेचा जन्म झाला आहे. समाजाचे क्रांतीसुर्य स्व.बी.कोकरे साहेब यांचा वसा आणि वारसा घेऊन त्यांची विचारधारा जोपासण्याचे व स्व.बी.के.कोकरे साहेबांनी उभा केलेली चळवळ पुढे घेऊन जाण्याचे कार्य हे यशवंत युवा सैनिक  यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली करत आहेत. गेल्या ७० वर्षापासून धनगर समाजावर अन्याय आणि अन्यायच झाला पण त्याचा तमाशा बघण्याचे काम केवळ प्रस्थापित व्यवस्थेने केले आणि त्याला खतपाणी घालण्याचे काम माझ्याच समाजातील समाजाचे भांडवलीकरण करणाऱ्या भांडवलदारांनी केले पण आता इथून पुढे ते शक्य नाही कारण गावागावातील, वाड्यावस्त्यावरील युवक आता अन्यायच्या विरोधात पेटून उठलेला आहे आणि हाच पेटून उठलेला युवक अन्याय करणाऱ्या औलादींना पेटवून टाकणार आहे हे मात्र निश्चित... धनगर समाजाला आपल्या हक्काचे आरक्षण आज ना उद्या नक्कीच मिळेल पण जरी धनगर समाजाला आरक्षणाची चौकट उघडी करून दिली तरी त्याचा लाभ धनगर समाजातील माझ्या किती...

व्यथा पिंजऱ्यातल्या पाखरांची : कवी श्रीराम अनुसे

Image
ज्या माणमातीला ग.दि.माडगुळकर, शंकरराव खरात, व्यंकटेश माडगुळकर, ना.सि.इनामदार, प्रा.बालाजी वाघमोडे अशा थोर साहित्यिकांचा लेखकांचा वारसा लाभला त्याच माणदेशातील आटपाडी तालुक्यांतील उगवते सुप्रसिद्ध कवी सिताराम अनुसे उर्फ कवी श्रीराम अनुसे यांचा जन्म तसे पाहता सर्वसामान्य मेंढपाळ कुटूंबातीलच... पण ज्या पुरूषप्रधान व्यवस्थेमध्ये स्री ला केवळ चूल आणि मूल बघावे लागत होते त्याच स्त्रीयांवर जो अन्याय व अत्याचार होतो त्याचे शाब्दिक आणि भावनिक वर्णन कवी श्रीराम अनुसे यांनी त्यांच्या व्यथा पिंजऱ्यातील पाखरांची या काव्यसंग्रहात प्रत्येक काव्यात आणि प्रत्येक ओळीत केले आहे. मराठी भाषांतील एखाद्या तत्ववेत्त्याला देखिल लाजवणारे काव्य वाचले/अभ्यासले तर दगडाला देखिल पाझर फुटेल असा अप्रतिम काव्यसंग्रह कवी श्रीराम अनुसे यांनी तुम्हा-आम्हासमोर ठेवलेला आहे. स्रीला अबला समजून त्यांच्यावर विनाकारण अन्याय व अत्याचार केला जातो याचे विवेचन काव्यामध्ये करत असतानाच महिलांचे सबलीकरण करण्यासाठी देखिल प्रयत्न केल्याचे दिसून येते. २१ व्या तंत्रज्ञानविकसित युगात महिलांच्या भावना जाणून समाजाची डोकी नांगरण्याचा जो विड...

वाढदिवस यशवंत युवा सेनेच्या शिलेदाराचा

Image
यशवंत युवा सेनेच्या शिलेदाराचा वाढदिवस विशेष... समाजासाठी झटणारे झगडणारे, समाजाच्या प्रश्नांसाठी वाचा फोडणारे, रात्री-अपरात्री समाजबांधवांच्या हाकेला धाऊन जाणारे आमचे परममित्र, कायदेपंडित तथा यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य चे सरचिटणीस कायदा सल्लागार मा.ॲड.रविकिरण कोळेकर साहेब यांचा आज वाढदिवस त्या निमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा. समाजसेवा हीच ईश्वरसेवा असे मानून अविरत समाजकार्य करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यांतील रड्डे गावचे सुपूत्र कायदेतज्ञ ॲड.रविकिरण रविकिरण कोळेकर साहेब यांच्या बद्दल बोलावे, लिहावे तेवढे कमीच... गेल्या ३० आॅक्टोबर २०१६ रोजी हुलजंती येथे महालिंगराया यात्रेनिमीत्त यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य आयोजित भव्य धनगर महासभेत जलसंधारण तथा राजशिष्टाचार मंत्री ना.राम शिंदे साहेब यांनी महालिंगराया देवस्थानचा विकास करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्याचा पाठपुरावा करण्याचे काम यशवंत युवा सेनेचे सरचिटणीस मा.ॲड.रविकिरण कोळेकर साहेब व यशवंत युवा प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी केले. त्याचबरोबर मंगळवेढा तालुक्यातील समाजबांधवांना एकत्रित करून समाज...

अबब ! हत्तीवरून मिरवणूक...

Image
माणदेशातील बारमाही दुष्काळी भाग म्हणून सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्याची ओळख अखंड महाराष्ट्र राज्यभर आहे. पण याच दुष्काळी भागातील काही विद्यार्थ्यांनी दुष्काळाशी दोन हात करून संकटांशी, परिस्थीतीशी झुंज देत चक्क युपीएससी व एमपीएससी स्पर्धा परिक्षांमध्ये असे यश संपादन केले की त्याला तोडच नाही अशा विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान सोहळा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ तथा युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेबांनी घेताला आणि काल शनिवार दि.१५ जुलै २०१७ रोजी आटपाडी येथे कोणतीही जातपात न मानता सर्व बहुजन समाजातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून व हत्तीवरुन मिरवणूक काढून नुसत्या आटपाडी तालुक्यांत वा सांगली जिल्ह्यातच नव्हे तर अखंड महाराष्ट्र राज्य आणि भारतात एक आगळा वेगळा उपक्रम राबवून माणदेशातल्या आटपाडी तालुक्यांतील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले स्वताच्या हाताने साखर वाटून आटपाडी तालुक्यांतील गुणवंतांचे पालकत्व निभावले असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही. युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेबांनी युपीएससी मध्ये यश मिळवल...

यशवंत युवा सेना शाखा नेपथगावचा अनोखा उपक्रम

Image
 यशवंत युवा सेना प्रमुखांच्या आवाहनाला साथ देत पंढरपूर येथील यशवंत युवा सेना शाखा नेपथगावच्या वतीने यशवंत युवा सैनिकांनी वृक्षारोपन मोहिम हातात घेऊन राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांच्या कार्याला उजाळा दिला आहे. स्त्री असूनदेखिल आदर्श राजकारभार व उत्कृष्ट प्रशासन व्यवस्था सांभाळणाऱ्या राष्ट्रमाता अहिल्याईंचा आदर्श घेऊन युरोपातील राष्ट्रं प्रगतीपथावर पोहचली मात्र ज्या मातीत माझ्या राष्ट्रमाता अहिल्याईंचा जन्म झाला ती माती मात्र अहिल्याईंच्या विचारांपासून दूर झाली नव्हे तर काही जातीयवादी इतिहासकारांमुळे राष्ट्रमाता अहिल्याईंचा इतिहास अंधारात ठेवण्याचे पाप त्या सनातनी इतिहासकारांनी केले होते. परंतु आज यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य ही क्रांतीकारी संघटना राष्ट्रमाता अहिल्याईंचा वारसा आणि इतिहास जपत असल्याचे ज्वलंत आणि जिवंत उदाहरण म्हणजेच यशवंत युवा सेना शाखा नेपथगाव ता.पंढरपूर येथील यशवंत युवा सैनिकांनी हाती घेतलेला वृक्षारोपनाचा उपक्रम. यशवंत युवा सेना ही संघटना नुसती प्रसिद्धीसाठी कार्य करत नाही तर सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. मेंढपाळ बांधवांशी चर्चा करून त्यांच्या समस्या काय आह...

यशवंत युवा सेना प्रमुखांचा आज जळगांव दौरा

Image
यशवंत युवा सेना प्रमुख आज जळगांव दौऱ्यावर मेंढपाळांच्या आणि समाजबांधवांच्या हाकेला धाऊन जाणाऱ्या, समाजाच्या न्याय व हक्कासाठी लढणाऱ्या झगडणाऱ्या क्रांतीकारी संघटनेचे अर्थातच स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या विचारधारेवर मार्गक्रमण करणाऱ्या यशवंत युवा सेनेचे प्रमुख तथा स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या विचारांचे वारसदार मा.विवेक कोकरे साहेब आज जळगांव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते जळगांव जिल्ह्यासह नाशिक, धुळे, बुलढाणा तसेच आसपासच्या जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या तसेच समाजबांधवांच्या भेटी घेणार असून त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. तरी जळगांव जिल्हा व आसपासच्या कार्यकर्त्यांनी समाजबांधवांनी यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांच्याशी संपर्क साधावा. संपर्क क्र. निर्भिड व सुप्रसिद्ध व्याख्याते मा.विवेक कोकरे साहेब (यशवंत युवा सेना प्रमुख महा.राज्य) +91 98814 59509 +91 79-72050932 जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥            *उमेशराजे अनुसे*        पश्चिम महाराष्ट्र प्रमुख 🙏यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य🙏     ...

भव्य मोटारसायकल रैलीचे नियोजन लांबवले

Image
बारामती येथील २१ जुलै रोजी होणाऱ्या व मुंबई येथे १ आॅगस्ट रोजी होणाऱ्या धनगर समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्या आंदोलनात कोणताही व्यत्यय येऊ नये व समाजाचे अधिकार व हक्क समाजाला लवकरात लवकर मिळावेत म्हणून २६ जुलै २०१७ रोजी यशवंत युवा सेना आयोजित करण्यात आलेली सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव द्यावे यासाठी भव्य मोटारसायकल रैली यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्यच्या वतीने आयोजित करण्यात आली होती परंतु समाजाच्या न्याय व हक्कासाठी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ती भव्य मोटारसायकल रैली २६ जुलै ऐवजी आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी दिली. समाजाचे प्रश्न सुटावेत व समाजाला न्याय मिळावा ही या क्रांतीकारी संघटनेची विचारधारा आहे स्व.बी.के.कोकरे साहेबांची ही विचारधारा जपणे आणि जोपासणे हे यशवंत युवा सेनेचे आद्य कर्तव्य आहे. धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षण लढ्यासोबतच समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत मात्र राजकीय नेत्यांकडून मंत्र्यांकडून त्याकडे जाणूनबूजू...

मेंढपाळांच्या मदतीसाठी धावले यशवंत युवा सेनेचे शिलेदार

Image
शुक्रवार दि. ७ जुलै २०१७ रोजी सांगलीच्या वाळवा तालुक्यांतील माणिकवाडी गावचे मेंढपाळ बांधव चारणीसाठी भटकंती करत करत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात आले असता अनकढाळ येथे काही मराठा समाजाच्या विकृत लोकांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण देखील केली तेव्हा मेंढपाळ बांधवांनी देखिल त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले परंतु चिंधके येथील मराठा समाजातील काही समाजकंटक लोक त्या मेंढपाळांच्या बकऱ्या टेम्पोमध्ये भरून घेऊन गेले. सदरच्या मेंढपाळ बांधवाचे भाऊ आनंद गढाळे यांनी मला याबाबत लागलीच खबर दिली असता मी सदरचा वृत्तांत यशवंत युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख मा.अवधूत वाघमोडे साहेब यांना सांगितला व लगेच त्यांनी कार्यकर्त्यांसोबत घटनास्थळी धाव घेतली व घटनेची चौकशी केली. यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य चे संपर्क प्रमुख मा.अवधूत वाघमोडे साहेब, यशवंत युवा सेनेचे खंबीर नेतृत्व मा.बिरूदेव शिंगाडे तसेच अन्य कार्यकर्त्यांसह पोलिस यंत्रणा देखिल घटना स्थळी दाखल झाली असता मराठा समाजातील त्या कटू वृत्तीच्या लोकांच्या पायाखालची वाळू सरकली. मेंढ्या का उचलून असा जाब विचारला असता त्यांनी सांगितले की में...

आमच्या पोरास्नी शाळा कसली ठाऊकच नाय...

Image
हे बोल ऐकल्यावर चटकण डोळ्यात पाणी उभा राहिले आणि थोडा वेळ स्थिर झालो. हे बोल आहेत पायाच्या नडग्या वाळेपर्यंत शेळ्या-मेंढ्यांसाठी चाऱ्याच्या शोधात आणि कुटूंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण फिरून भटकंती करणाऱ्या सुळेवाडी ता.माळशिरस जि.सोलापूर येथील माझ्या मेंढपाळ बांधवांचे. यशवंत युवा सेनेचे मुंबई विभाग प्रमुख मा.तानाजीराजे गोयेकर यांनी चारणीवरून परत निघालेल्या मेंढपाळ बांधवांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व मेंढपाळ बांधवांना कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते यांची विचारपूस करून यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य ही संघटना तुमच्या सोबत असल्याचा विश्वास आणि दिलासा दिला. एकीकडे शासनाने ६-१४ वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची व्यवस्था केली असताना देखिल माझ्या धनगर समाजातील मुला-मुलींना मात्र अणवानी पायानं शेळ्या-मेंढ्यांच्या मागे फिरावे लागते ही फार मोठी शोकांतिका आहे. अलिशान एअरकंडीशन गाड्यांतून, स्कूल बसेसमधून शाळेला जाणारी मुले पाहिली की आमच्या धनगर समाजातील मुला-मुलींना देखिल शाळेला जाण्याची ओढ लागते पण ते आमच्या मुलांच्या नशिबात नसतं त्याचे कारण असे की जी मुले एअरक...

वाढदिवस आज विचारधारेचा...

Image
राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी देखिल तेव्हा सांगितले होते  की इतरांनी अंधारात  केलेली कामं ही उजेडात (समोर) येतात पण आमच्या लोकांनी उजेडात केलेली कामं ही कायम अंधारातच राहतात. म्हणून आमच्या लोकांनी उजेडात जी काही कामं केली आहेत पण ठराविक व्यवस्थेमुळे ती कायम अंधारातच राहीली ती उजेडात यावीत समाजासमोर यायला हवीत आणि अख्ख्या जगाला कळवावीत आणि हेच एकमेव ध्येय ठेऊन एकेकाळी राजा जमात असलेल्या धनगर समाजाचा इतिहास जगासमोर यावा, समाजातील नेत्यांनी केलेली समाजोपयोगी लोकोपयोगी कामे ही लोकांसमोर यावीत, समाजाचे प्रश्न सरकार दरबारी जावेत व त्यांना न्याय मिळावा. राजकारणापासून सत्ताकारणापासून उपेक्षित असलेल्या समाजाला न्याय मिळावा, मेंढपाळांचा आक्रोश सत्तापिपासू लोकांच्या कानात गुंजावा, स्व.बी.के.कोकरे साहेबांनी ज्या आरक्षणाच्या चळवळीला जन्म दिला ती चळवळ मजबूत व्हावी, समाजात जागृती होऊन समाजात एकी व्हावी, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा नुसता उपदेश न राहता त्याचे अनुकरण समाजबांधवांनी करावे म्हणून समाजप्रबोधनाच्या माध्यमातून समाज जागृती आणि एकी व्हावी...