Posts

Showing posts from August, 2017

धुळे येथे वनरक्षक बनलेत भक्षक, ७ सप्टेंबर ला मोर्चा

Image
एकतर शेळ्या मेंढ्यांसाठी असलेली चराऊ कुरणे सरकारने आपल्यात घशात घातली वरून वनरक्षकांचा नंगानाच चालू आहे. अर्थातच तोंड दाबून बुक्क्यांचा मार दिला जातोय. असाच प्रकार घडलाय धुळे जिल्ह्यातील हडसुणे येथे दि.१६आॅगस्ट २०१७ रोजी चिंतामण धोंडीराम ठेल्लारी या धनगर बांधवास वनरक्षकाने व त्याच्या १२ ते १५ सहकाऱ्यांनी/अधिकाऱ्यांनी मिळून बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करून त्याचा मोबाईल देखिल तोडून टाकला आहे. याशिवाय त्या प्रसंगी इतर कोणी नसताना देखिल अन्य १७ समाजबांधवांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा खोटा गुन्हा दाखल करून अटक सुद्धा केली आहे. चिंचामण ठेल्लारी यांची वैध्यकीय तपासणी केली असता त्यांना बेदम अमानुष मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील धनगर समाजबांधवांनी दि.२८ आॅगस्ट रोजी वनपाल व वनरक्षकांच्या निषेधार्थ बैठक घेतली होती त्यामध्ये ७ सप्टेंबर २०१७ रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. एकीकडे कोट्यवधी धनगर एका झेंड्याखाली अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी एकत्रित येत आहेत हे माहित असताना देखिल वनरक्षकांची/वनपालांची एवढी मस्ती कोणामुळे वाढ...

सोलापूर विद्यापीठ नामांतरण लढा यशस्वी, २५-५० लाख धनगरांचा उत्स्फूर्त सहभाग

Image
सोमवार दि.२८ आॅगस्ट २०१७ ला झालेला सोलापूर विद्यापीठ नामांतरण लढा खरोखर यशस्वी झाला. २१ जुलै २०१४ च्या मोर्चा नंतर सरकारला धनगर समाजाची ताकद पुन्हा एकदा कळाली. २५-५० लांखाच्या संख्येने धनगर समाजाचा मोर्चा सोलापूरात घोषणा देत सरकारचा निषेध करत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. तिथे अनेक मान्यवरांची भाषणे झाली. सोलापूर विद्यापीठाला लवकरात लवकर राष्ट्रमाता अहिल्याईंचे नाव द्यावे असे शासनाला आठ दिवसांचे अल्टिमेटम दिले आहे अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अखंड धनगर समाजाने दिला आहे. आणि सरकारला काहीही करून सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव द्यावेच लागेल यात काही वादच नाही. या लढ्यात धनगर समाज सर्व ताकदीने रस्त्यावर उतरला आणि सोलापूर शहर पिवळ्या भंडाऱ्यात न्हाऊन निघाले. सर्व माता-भगिनी, समाजबांधव भर पावसात भिजत आंदोलनात उभे होते. जेव्हा काल रात्री मी स्वता "ही तर येणाऱ्या वादळाची पूर्वसुचना आहे" या आशयाचा पहिला ब्लाॅग लिहला  त्यामध्ये कोणत्याही व्यक्तीचे नाव व पद वापरले नव्हते. केवळ धनगर समाजाच्या नेतृत्वामुळेच अहिल्या कन्यांमुळे आणि तुम्ह...

ही तर येणाऱ्या वादळाची पुर्वसुचना आहे...

Image
आज सोमवार दि.२८ आॅगस्ट २०१७ रोजी सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरण लढ्यात महाराष्ट्र राज्यातील तमाम धनगर समाज बांधव एकवटला होता. जिकडे पहावे तिकडे सोलापूर शहर अगदी पिवळे पिवळे झाल्याचे दिसून येत होते. सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव दिले तर जातीय तेढ वाढेल असे विधान शिक्षणमंत्री ना.विनोद तावडे यांनी केल्याने धनगर समाज बांधवांच्या भावना भडकल्या आणि स्वता लोकप्रतिनिधींनी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचा अपमान केल्याने धनगर समाजाच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा आयोजित केला होता. लाखोंच्या संख्येने धनगर समाजबांधव, माता-भगिनी, समाजातील सर्व संघटना तसेच सर्व पक्षातील धनगर समाजातील तसेच धनगरेत्तर नेते या मोर्चात सहभागी झाले होते. राज्य सरकार हे नेहमीच धनगर समाजाच्या मांगण्याचा कधीच विचार करत नाही परंतू डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत अधिकार दिल्याने आपल्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी लाखोंच्या संख्येने धनगर समाज रस्त्यावर उतरला व एकप्रकारे सरकारला दाखवून दिले की आम्ही अजूनही संघटित आहोत. एखाद्याला सत्तेत कसं आणायचं अथवा सत्तेतून खाल...

एक लढा राष्ट्रमातेसाठी पिवळ्या झेंड्याच्या आस्मितेसाठी

Image
एकेकाळी राजा समाज असलेली जमात आज आपल्या हक्कासाठी लढत आहे झगडत आहे हे सांगायला देखिल लाज वाटते. पण ही वेळ धनगर समाजावर यायला कारणीभूत आहेत ते धनगर समाजातीलच लोकप्रतिनीधी ज्यांना सत्तेची आणि खुर्चीची हाव सुटली आहे. मराठा क्रांती मोर्चात आपले लोकप्रतिनिधी पाणी वाटत बसतात पाठिंबा देतात पण धनगर समाजाचा मोर्चा म्हंटलं की शेपूट घालून कुठे बसतात कोणास ठाऊक? कारण त्यांना लाज वाटतेय धनगर म्हणून घ्यायची पण निवडणूका जवळ आल्या की धनगरांवर गोड गोड भाषणं करायची आणि निवडणूका झाल्या, **खाली पदं आली की समाजाशी माझं काही घेणे देणे नाही असे म्हणत समाजाला शिव्या हासडायला हे बहाद्दर कुठेच कमी पडत नाही. त्यातल्या त्यात धनगर समाजात देखिल संघटितपणा नाही समाजासाठी संघर्ष काय असतो ते २१ जुलै २०१४ च्या बारामतीच्या मोर्चानंतर धनगर समाज स्वता विसरलेला दिसतोय. एवढेच नव्हे तर प्रत्येकाला नेता बनायची हौस वाढल्याचे देखिल दिसून येते मग संघटना काढायची हुकी येते मग संघटनेच्या माध्यमातून थोडीफार ओळख समाजात झाली की गड्याला शिंगे फुटतात विधानपरिषदेची स्वप्नं पडायला लागतात त्याला मंत्री झाल्यासारखंच वाटतं मग ज्यांच्यामुळे...

मी पण येणार... तुम्ही पण या...

Image
सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याईंचे नाव द्यायला सोलापुरात पिवळं वादळ येणार मी पण येणार अन् तुम्ही पण या... ज्या राष्ट्रमातेने जात-पात, धर्म, संप्रदाय, प्रांत, साम्राज्य यापलीकडे जाऊन अखंड भारतभर विकासकामे केली त्यामध्ये केवळ इंदौर राज्याच नव्हे तर काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत व गुजरात पासून आसामपर्यंत बारा जोतिर्लिंगासह १२६७३ मंदिरे राष्ट्रमाता अहिल्याईंनी स्वताच्या खाजगी निधीतून बांधली त्याशिवाय हजारो मशिदी, दर्गे, मजार बांधण्यासाठी त्यांनी मुक्तहस्ताने मदत केली, दानधर्म केला. चारधाम, बारा ज्योतिर्लिंग व ४३ धर्मशाळांना मोठमोठ्या देणग्या दिल्या. राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचा जन्म महाराष्ट्राच्या मातीतच झाला असून एक स्त्री असतानादेखिल  मराठी साम्राज्य सांभाळण्याचे व शत्रुंपासून टिकवण्याचे अबाधित राखण्याचे काम या मायमाऊलीने केले. ऐन दुष्काळात गोरगरिबांसाठी अन्नधान्याचा पुरवठा केला शिवाय त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला, अनेक विधवांना/निपूत्रीकांना न्याय देऊन त्यांच्यावर लादले गेलेले अन्यायकारक व जाचक कायदे रद्द करणाऱ्या पहिल्या न्यायदेवता, प्रजेला छळणाऱ्यांना शासन ...

त्या माथेफिरू शिक्षकाला निलंबित करा : टिंग्या

Image
धनगर समाजातील माता भगिनींबद्दल सोशल मिडीयावरती अपशब्द वापरून शिक्षकी पेशास काळीमा फासणाऱ्या त्या माथेफिरू शिक्षकाला निलंबित करण्यात यावे अशी मागणी लोकप्रिय अभिनेते राष्ट्रपती पुरस्कार विजेता तथा यशवंत युवा सेनेचे युवकप्रदेशाध्यक्ष मा.शरद गोयेकर उर्फ टिंग्या यांनी केली आहे. २८ आॅगस्ट रोजी सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरण लढ्यासंदर्भात आयोजित केलेल्या नियोजन बैठकीत ते बोलत होते. सोलापूर राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव दिल्यास सोलापूर विद्यापीठाचा सन्मान होणार आहे परंतू जातीयवादी सरकार जातीय तेढ निर्माण करण्याच्या वल्गना करत असून धनगर समाजाच्या मागणीची दखल घेत नाही. त्यासाठी यशवंत युवा सेना आयोजित असलेला १५ सप्टेंबर चा मोर्चा व मोटारसायकल रैली रद्द करून धनगर समाजाची एकजूट करण्यासाठी यशवंत युवा सेनेच्या वतीन मंगळवेढा येथे दि १८ आॅगस्ट रोजीच घोषणा केली होती. आता निषेध करायचा नाही तर हिशोब करायचा असा नारा देत  २८ आॅगस्ट २०१७ रोजी भव्य मोर्चात सहभागी होणार असल्याचे यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी जाहीर केले होते. त्यानुषंगाने आज अहमदनगर येथे नियोजन बैठक बोलविली ...

अहिल्याभक्तांनो आतातरी पेटून उठा

Image
शत्रुंना तलवारीच्या टोकावर तोलणाऱ्या व त्यांच्या छातीवर बसून थय्याथय्या नाचणाऱ्या ज्या राजा समाजात तुम्ही आम्ही जन्माला आलो त्या समाजाचं काहीतरी दायित्व लागतो म्हणून व राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांची आस्मिता जपण्यासाठी त्यांचा वारसा जोपासण्यासाठी आता वेळ आली आहे रस्त्यावर उतरायची आणि जातीयवादी सरकारला ताळ्यावर आणायची लाखोंच्या संख्येने २८ आॅगस्ट २०१७ रोजी सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरण लढाईत सहभागी व्हा. सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव दिले तर कोणाच्या पोटातलं पित्त खवळतंय ते एकदा कळू द्या या महाराष्ट्र राज्याला. मग सांगू त्यांना धनगर समाज काय आहे ते... हवं तर सांगा त्या पुरोगाम्यांचा बुरखा पांघरलेल्या औलादींना, पुरोहितवाद्यांना/सनातन्यांना की एकतर धनगर समाज कोणाच्या वाट्याला जात नाही आणि जर का कोणी वाट्याला गेला तर त्याच्या वाटेवर जावून त्याची वाट लावल्याशिवाय धनगर समाज आपल्या वाटेवर परत येत नाही हा इतिहास जावून सांगा त्या जातीयवादी भांडवलदारांना. एक धनगर विराट धनगर एक धनगर लाख सिकंदर लाख सिकंदर जरी आले तरी आद्यसम्राट चंद्रगुप्त मोर्यासारखा एक धनगर ...

नामांतरण लढ्यात लोखोंच्या संख्येने सहभागी व्हा

Image
ज्या राष्ट्रमातेने जात-पात, धर्म, संप्रदाय, प्रांत, साम्राज्य यापलीकडे जाऊन अखंड भारतभर विकासकामे केली त्यामध्ये केवळ इंदौर राज्याच नव्हे तर काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत व गुजरात पासून आसामपर्यंत बारा जोतिर्लिंगासह १२६७३ मंदिरे राष्ट्रमाता अहिल्याईंनी स्वताच्या खाजगी निधीतून बांधली त्याशिवाय हजारो मशिदी, दर्गे, मजार बांधण्यासाठी त्यांनी मुक्तहस्ताने मदत केली, दानधर्म केला. चारधाम, बारा ज्योतिर्लिंग व ४३ धर्मशाळांना मोठमोठ्या देणग्या दिल्या. राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचा जन्म महाराष्ट्राच्या मातीतच झाला असून एक स्त्री असतानादेखिल  मराठी साम्राज्य सांभाळण्याचे व शत्रुंपासून टिकवण्याचे अबाधित राखण्याचे काम या मायमाऊलीने केले. ऐन दुष्काळात गोरगरिबांसाठी अन्नधान्याचा पुरवठा शिवाय त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला, अनेक विधवांना/निपूत्रीकांना न्याय देऊन त्यांच्यावर लादले गेलेले अन्यायकारक व जाचक कायदे रद्द करणाऱ्या पहिल्या न्यायदेवता, प्रजेला छळणाऱ्यांना शासन करण्यासाठी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी सर्वप्रथमता न्यायालयांची स्थापना केली. आदर्श राज्यकारभार करणाऱ्या व पारदर्शक प्...

यशवंत युवा सेनेने घेतले समाजासाठी एक पाऊल मागे, मोर्चा २८ आॅगस्ट ला

Image
समाजापेक्षा संघटना मोठी नव्हे आणि समाजासाठीच तर संघटना स्थापने केलेल्या असतात. मग समाजाच्या प्रश्नासाठी समाजाबरोबर मार्गक्रमण करणे ही यशवंत युवा सेनेची विचारधारा असून स्व.बी.के.कोकरे साहेबांचे विचार समाजात रुजवण्यास यशवंत युवा सेना सक्षम आहे. सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरासाठी समाजाचे दोन दोन मोर्चे निघणार अशा घोषणा झाल्या होत्या  त्यामुळे धनगर समाजात संभ्रम निर्माण की नक्की कोणत्या मोर्चात सहभागी व्हायचे? जरी दोन्ही मोर्चे निघाले तर धनगर समाजाचेच हसू होईल म्हणून यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य या क्रांतीकारी संघटनेच्यावतीने आयोजित असलेली १५ सप्टेंबर २०१७ ची पुर्वनियोजीत भव्य मोटारसायकल रैली व मोर्चा रद्द करून यशवंत युवा सेना संपूर्ण ताकदीनिशी सोमवार दि.२८ आॅगस्ट रोजी होणाऱ्या मोर्चात सहभागी होणार असल्याचे यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी काल दि.१९ आॅगस्ट रोजी मंगळवेढा जि.सोलापूर येथे झालेल्या धनगर समाजाच्या बैठकीत जाहिर केले. ज्या राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी जात, धर्म, पंथ, संप्रदाय, साम्राज्य, प्रांत, राज्य यापलीकडे जाऊन अखंड राष्ट्रभर विकासकामे केली,...

यशवंत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांमुळे मिळाले पेशंटला जीवनदान

Image
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुकास्थित असलेल्या जठार हाॅस्पीटल मध्ये ॲडमीट असलेल्या पेशंटचे नातेवाईक श्री डोमाळे यांचा काल दि.१९ आॅगस्ट रोजी यशंवत युवा सेनेचे सोशल मिडीया जिल्हा प्रमुख मा.नवनाथ वावरे साहेब यांना फोन आला व सांगितले  की जठार हाॅस्पीटल येथे ॲडमीट असलेल्या एका वृध्द महिलेला अर्जंट रक्त भरावे लागणार असून एका ब्लड बॅंकची व्यवस्था करावी लागणार आहे तेव्हा क्षणाचाही अवलंब न करता पेशंटचा जीव वाचवण्यासाठी यशवंत युवा सेनेचे सोशल मिडीया जिल्हा प्रमुख मा.नवनाथ वावरे साहेब व यशवंत युवा सेनेचे अहमदनगर जिल्हा युवककार्याध्यक्ष मा.कोंडाजी कडनर यांनी तात्काळ संगमनेर येथील अर्पण ब्लड बॅंक मध्ये जाऊन ब्लड डोनर कार्ड द्वारे पेशंटसाठी एक ब्लड बॅग उपलब्ध करून दिली. सदरची महिला वृद्ध पेशंट ही संगमनेर तालुकास्थित जठार हाॅस्पीटल येथे उपचार घेत आहे. यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य च्या पदाधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वृद्ध महिला पेशंट यांना वेळेवर रक्त मिळाल्याने जीवनदान मिळाले त्यामुळे यशवंत सैनिकांच्या या उत्तम कामगीरीमुळे सर्व जिल्हाभर त्यांचे कौतुक केले जात असतानाच राष्ट्रपती पुरस्कार ...

शिकलेल्या त्या पोरास्नी म्हणावं....

Image
शिकलेल्या त्या पोरास्नी म्हणावं, माघारी जरा फिरून तरी बघ... आडाणी असलेल्या मायबापाची, जरा विचारपूस तरी करून बघ... खूप सोसल्या रे दुखाच्या झळया, थोडसं जरा आठवून तरी बघ... सुकलेल्या त्या चेहर्यावरचं, अश्रू डोळ्यांत साठवून तरी बघ... तळहाताच्या त्या फोडासारखा, त्यांनी जपला रं तुला असा अलगद... नाही कमी पडू दिलं रं गड्या, पोटाची ती खळगी बडवत... शिकला पाहिजे आपला पोरगा, म्हणून चिंतातूर असे मायबाप... काय म्हणून त्यांस विसरुन जावे, उगाचि कशाला ओढावतोस रे पाप... रक्ताचं नातं हाय ते गड्या, तुला नाय कळायचे सहजासहज... ज्यावेळी होशील तु कोणाचा बाप, त्यावेळी तुला येईल रं खरी समज... जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥      *✍️नितीनराजे अनुसे✍️* अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली          +९१७६६६९९४१२३ nitinrajepublications.blogspot.com

यशवंत युवा सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना जिलेबी वाटप

Image
*आज 71 वा भारतीय स्वातंत्र्यदिना निमित्त यशवंत युवा सेना सांगली जिल्ह्याच्या वतिने यशवंत युवा सेना सांगली जिल्हा उपप्रमुख मा.सागर मलगुंडे भाऊ यांचे हस्ते हुबालवाडी ता.वाळवा. येथील विद्यार्थी मित्रांना जिलेबी वाटप करण्यात आले.*यावेळी हुबालवाडी गावचे सरपंच मा.प्रदिप सुर्यवंशी,मा.संजय हुबाले (तात्या),स्कुल कमिटीचे अध्यक्ष मा.संजय हुबाले(नाना),व विजय हुबाले(भाऊ),गावातील सर्व मान्यवर व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद व विद्यार्थी व विद्यार्थीनी,ग्रामस्थ उपस्थित होते. *कार्यक्रमाचे संयोजन* यशवंत युवासेनेचे योगेश हुबाले,जगन्नाथ शिंदे ,विजय डांगे व शुभम पाटील यांनी केले.

उपजिल्हाप्रमुख सांगर मलगुंडे ढाण्या वाघाच्या भेटीला

Image
यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य या क्रांतीकारी संघटनेचे सांगली जिल्हा उपप्रमुख मा.सागर (दादा) मलगुंडे यांनी कृष्णाकाठच्या भयावह पर्वाचा मानकरी असलेल्या बोरगावचा ढाण्या वाघ बापु बिरू वाटेगावकर उर्फ आमचे लाडके आप्पा यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. आप्पांच्या गुडघ्यांवर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया केली होती त्यामुळे सध्या आप्पा आपल्याच घरी बोरगाव (वाळवा) जि.सांगली येथे आराम करत आहेत. यशवंत युवा सेना सांगली जिल्ह्याचे  उपप्रमुख मा.सागर (दादा) मलगुंडे तसेच यशवंत युवा सेनेचे अनेक सक्रीय कार्यकर्त्यांनी भेट घेऊन विचारपूस केली.  आप्पांनीही विचारपूस करण्यासाठी आलेल्या मा.सागर (दादा) मलगुंडे यांना सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. मा.सागर (दादा) मलगुंडे हे नुकतेच उपजिल्हाप्रमुख पदावर नियुक्त झाले असून त्यांची निवड यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब व सांगली जिल्हा प्रमुख मा.पै.राहूल रूपनर यांच्या उपस्थितीत करण्यात आली तर यशवंत युवा सेनेचे सरचिटणीस ॲड.रविकिरण कोळेकर यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले. यशवंत युवा सेना संघटना ही यशवंत युवा सेना प्रमुख मा....

सोलापूर युवक कार्याध्यक्ष पदावर बिरा गोरड

Image
यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य च्या सोलापुर जिल्हा युवक कार्याध्यक्ष या पदावर मा.बिरा गोरड यांची निवड करण्यात आली असून ही निवड यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्यचे युवकप्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रपती पुरस्कार विजेते मा.शरद गोयेकर (टिंग्या) यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली त्यावेळेस यशवंत युवासेनेचे माळशिरस तालुकाप्रमुख मा.आबासाहेब बगाडे, भांबुर्डी चे यशवंत युवा सेना शाखा प्रमुख मा.रणजीत वाघमोडे, यशवंत युवा सेनेचे सक्रीय कार्यकर्ते मा.दिपक सरक, मा.आनंदा गारळे तसेच यशवंत युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. मा.बिरा गोरड यांच्या रूपाचे सोलापूर जिल्ह्याला एक युवा तडफदार नेतृत्व मिळाले असून समाजासाठी झटणाऱ्या व झगडणाऱ्या यशंवत युवा सेना या क्रांतीकीरी संघटनेच्या माध्यमातून अविरतपणे झटणार असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित सोलापूर जिल्हा युवक कार्याध्यक्ष मा.बिरा गोरड यांनी केले. त्याप्रसंगी यशवंत युवा सेनेचे युवकप्रदेशाध्यक्ष मा.शरद गोयेकर यांचा सत्कार देखिल करण्यात आला. सोलापूर जिल्ह्याचे नवनिर्वाचित युवक कार्याध्यक्ष मा.बिरा गोरड यांचे हर्दिक हर्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे पुढील सामाजिक वाटचा...

तेव्हाच माझ्या राष्ट्रमातेला खरे अभिवादन असेल

Image
माता अहिल्ये तुझी जगभर कीर्ती तूच होतीस महान प्रशासनकर्ती माते तुझी घेऊनिया स्फूर्ति लढण्यासाठी घेऊन तलवार हाती आम्हीही उतरतो आता रणांगणावरती.....                एक स्त्री असूनदेखिल या देशाच्या विशाल भूभागावर जवळजवळ २८ वर्ष राज्यकारभार करणारी महाक्रांतीकारी राज्यकर्ती, १८व्या शतकातील जगातील एकमेव आदर्श आणि महान प्रशासक असा उल्लेख अक्षरशा ब्रिटिशांनी करून ठेवला आहे अशा विश्वरत्नरूपी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचा आज स्मृतीदिन त्यानिमीत्ताने राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे जिवनकार्य नमुद करून महाराष्ट्र राज्यातील जनतेला इतिहासाची जाण करून द्यावी यासाठी केलेला लेखप्रपंच.... आपल्या राज्यातील प्रजेलाच नव्हे तर अखंड भारतातील प्रजेला पोटच्या लेकरांप्रमाने सांभाळणारी मायमाऊली, एवढेच नव्हे तर जाती-धर्माच्या भींती तोडून स्वताच्या मुलीचा आंतरजातीय विवाह करून समाजासमोर आदर्श ठेवणारी थोर समाजसुधारक, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मंदिरांचा जिर्णोध्दार, मंदिरांचे बांधकाम, मश्चिदींचे बांधकाम, शेतकऱ्यांसाठी शेततळे, तलाव, विहीरी, वाटसरूंसाठी बारवे, ...

युवकप्रदेशाध्यक्ष टिंग्याने घेतल्या कार्यकर्त्यांच्या भेटी

Image
यवकप्रदेशाध्यक्षांनी घेतल्या कार्यकर्त्यांच्या भेटी यशवंत युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य युवकप्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रपती पुरस्कार विजेते मा.शरद गोयेकर (टिंग्या) यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन १५ सप्टेंबर २०१७ रोजी पंढरपूर  ते सोलापूर विद्यापीठावर होणाऱ्या भव्य मोटारसायकल रैली व मोर्चाच्या संदर्भात रणनीती आखली. मा.शरद गोयेकर हे फिल्म इंडस्ट्रीज मधील एक युवा दिग्दर्शक असून टिंग्या चित्रपटातील त्यांच्या उत्कृष्ट कामगीरीमुळे त्यांना बालवयात माजी राष्ट्रपती मा.सौ.प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. १५ सप्टेंबर च्या मोटारसायकल रैलीची रणनीती हाच टिंग्या जेव्हा एक युवा दिग्दर्शक बनून धनगर समाजावर आधारित बब्या चित्रपट बनवतो. समाजाच्या व्यथा जाणून घेतो तेव्हा तो स्वता समाजासाठी ह्रदयातून तीळतीळ तुटू लागतो. पुढे तो निस्वार्थीपणे समाजासाठी झटणाऱ्या व झगडणाऱ्या क्रांतीकारी संघटनेचा अर्थातच यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्यचा हिस्सा बनून फिल्म इंडस्ट्री सांभाळत समाजासा...

दोन्ही मोर्चासंदर्भात यशवंत युवा सेनेची भुमिका

Image
एकदा नव्हे तर दोनदा केवळ समाजातील अन्य मोर्चामुळे नियोजन लांबवून १५ सप्टेंबर २०१७ रोजीची यशवंत युवा सेनेच्या वतीने भव्य मोटारसायकल रैली व मोर्चा हे ९ आॅगस्ट रोजी जाहिर केले असताना व ही भव्य मोटारसायकल रैली पुर्यनियोजित असताना देखिल काल दि. ११ आॅगस्ट २०१७ रोजी सोलापूर येथे सोलापूर विद्यापीठाच्या निषेधार्थ मोर्चाच्या संदर्भात बैठक पार पडली. १५ सप्टेंबर २०१७ ला भव्य मोटारसायकल काढण्यात येणार असल्याची माहिती असून देखिल सदरचा मोर्चा हा बुधवार दि.२३ आॅग्स्ट २०१७ रोजी सोलापूर विद्यापीठावर काढण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले यातून समाजाला एकत्रित करण्यासाठी त्यांची किती तळमळ आहे हे दिसून येते असो...  परंतू यशवंत युवा सेना ही प्रथमता समाजाला स्थान देऊनच कार्य करते त्यामुळे त्या मोर्चासाठी यशवंत युवा सेनेचा पाठिंबा असून धनगर समाजाच्या एकीचा संदेश देणार आहे. परंतू २३ आॅगस्ट च्या मोर्चानंतर जर विद्यापीठ प्रशासनाने अथवा सरकारने जर धनगर समाजाच्या मागण्यांची पुर्तता नाही केली तर यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य च्या वतीने पूर्वनियोजित असलेली  पंढरपूर ते सोलापूर विद्यापीठावरील दि.१...

यशवंत युवा सेना सांगली उपप्रमुख पदी सागर मलगुंडे यांची निवड

Image
यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य या क्रांतीकारी संघटनेच्या सांगली जिल्हा उपप्रमुख या पदावर इस्लामपूरच्या (वाळवा) मा.सागर (दादा) मलगुंडे यांची निवड करण्यात आली आहे. मा.सागर मलगुंडे यांना यशवंत युवा सेनेचे सरचिटणीस ॲड.रविकिरण कोळेकर साहेब यांनी निवडीचे पत्र दिले असून समाजकार्य करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत. मा.सागर (दादा) मलगुंडे यांची निवड केल्याने वाळवा तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील युवा वर्गास आनंदाचे वातावरण आहे. यशवंत युवा सेना ही संघटना स्व.बी.के.कोकरे साहेब यांच्या विचारधारेवरती मार्गक्रमण करत असून स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या विचारांचे वारसदार तथा यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही संघटनेची घोडदौड सुरू आहे. यशवंत युवा सेनेने  निस्वार्थीपणाने कार्य करत असलेल्या सक्रीय कार्यकर्त्यांची निवड करून समाजासाठी झटणाऱ्या झगडणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय दिला आहे त्यामुळे यशवंत युवा सेना संघटनेच्या माध्यमातून समाजासाठी अविरत कार्य करणार असल्याचे प्रतिपादन यशवंत युवा सेनेचे नवनिर्वाचित सांगली जिल्हा उपप्रमुख मा.सागर (दादा) मलगुंडे यां...

सोलापूर विद्यापीठावरील मोटारसायकल रैली पूर्वनियोजित -उमेशराजे अनुसे

Image
सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नामकरण करण्यासाठी बाईक रँलीचे नियोजन जुन महिन्यापासून यशवंत युवा सेना करत आहे. जुलै महिन्यात यशवंत युवा सेना बाईक रँली पंढरपूर ते सोलापूर अशी काढणार होती.त्यावेळी पंढरपूर ते बारामती ही रँली धनगर आरक्षण कृती समितीने  काढण्याची तारीख जाहीर केली.त्या रँलीला व्यत्यय नको म्हणून यशवंत युवा सेनेने बाईक रँलीचे केलेले नियोजन रद्द करून पंढरपूर ते बारामती या रँलीला पाठिंबा दिला.नंतर या महिन्यात सुरुवातीला  ईतर आंदोलने व मोर्चा झाले त्या सर्व कार्यक्रमात यशवंत युवा सेनेच्या बाईक रँलीचा व्यत्यय नको म्हणून नियोजन पुढे ढकलण्यात आले.पण आता मागच्या दोन दिवसांपूर्वी नाशिकचे राष्ट्रवादीचे आ.जयंत पाटील यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना तारांकित प्रश्न अहिल्याबाई होळकर यांचे नाव सोलापूर विद्यापीठाला देण्यासाठी प्रश्न केला तेव्हा विनोद तावडे यांनी सोलापूर विद्यापीठ व्यवस्थापकीय समितीने जातीय तेढ व निकोप विकासाला अढथळा येईल हे कारण पुढे करून नामकरणाला विरोध केल्याचे सांगितले.त्यानंतर यशवंत युवा सेनेने पूर्वनियोजित बाईक रँली काढण्यासाठी केलेला कार्यक्...

तर सोलापूर विद्यापीठाला टाळे ठोकणारच -यशवंत युवा सेना प्रमुख

Image
धनगर समाजाच्या अारक्षण मोर्चाच्या अनुषंगाने एकदा नव्हे तर दोनदा यशवंत युवा सेनेच्या वतीने सोलापूर विद्यापीठाच्या नामंतरणासाठी आयोजित केलेले मोर्चे पुढे ढकलण्यात आले होते मात्र आता सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापकीय समितीची मस्ती अजून वाढत चालली आहे त्यामुळे अंत न पाहता शांत न बसतां राष्ट्रमाता अहिल्याईंचे नाव देता येत नसेल तर सोलापूर विद्यापीठाला टाळे ठोकणार असल्याचा पवित्रा घेत यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी काल दि. ९ आॅगस्ट २०१७ रोजी सोलापूर मुख्याधिकारी व आयुक्तांना निवेदन देऊन १५ सप्टेंबर २०१७ रोजी यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य च्या वतीने सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई यांचे नाव देण्यात यावे यासाठी पंढरपूर ते सोलापूर विद्यापीठांवर भव्य बाईक रैली व मोर्चाचे आयोजन केलेले आहे. सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव लवकरात लवकर द्यावे यासाठी धनगर समाजाची पंढरपूर ते मोहोळ मार्गे सोलापूर विद्यापीठावर भव्य मोटारसायकल रैली व मोर्चा काढण्यात येणार असून त्यामध्ये राज्यभरातून लाखो धनगर समाजबांधव सहभागी होणार आहेत. त्यामुळे सर्व धनगर समा...

आबासाहेबांना मानाचा मुजरा...

Image
महाराष्ट्र राज्याचे जेष्ठ नेते, जनसामान्यांचा आधार, धनगर समाजाचे भिष्मपितामह, सांगोला विधानसभा मतदारसंघातून एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तब्बल ११ वेळा आमदार होऊन ग्रिनीज बुक आॅफ द वर्ल्ड मध्ये रेकाॅर्ड प्रस्थापीत करणारे तुमचे आमचे सर्वांचे लाडके आमदार भाई गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा. खरंतर आबासाहेबांच्या जिवनावर आणि त्यांच्या कार्यावर लिहायचं म्हंटलं तर एक दोन ओळींत अथवा एक दोन पानांत लिहून होणार नाही तर येणाऱ्या काही महिन्यातच त्यांच्या जिवनकार्य पुस्तकाच्या रुपाने लिहावे म्हणतोय... तुर्तास धनगर समाजाची आण बान शान आमचे आदर्श, धनगर समाजाचा आधारस्तंभ, कायदेपंडित भाई आमदार गणपतराव देशमुख साहेब उर्फ आबासाहेब यांना त्यांच्या वाढदिवसानिमीत्त मानाचा मुजरा व पिवळा जय मल्हार. जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥ शुभेच्छूक,      *✍️नितीनराजे अनुसे✍️* अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली          +९१७६६६९९४१२३ nitinrajepublications.blogspot.com

यशवंत युवा सेना सभासद नोंदणी अर्ज

Image
वंचितांच्या हक्कासाठी वंचितांच्या न्यायासाठी निस्वार्थीपणाने लढणाऱ्या, झटणाऱ्या व झगडणाऱ्या क्रांतीकारी संघटनेचे भागीदार होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा. https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe-gJ5XffneaPhEdLFToYkH9bH3x71cB7VRCI7vL0G27FTLgg/viewform?usp=sf_link बस्स झाला आता अत्याचार यशवंत युवा सेना हेच आता हथियार यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!              नितीनराजे अनुसे अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली           +९१७६६६९९४१२३ nitinrajepublications.blogspot.com

१५ सप्टेंबर २०१७ रोजी धनगर समाजाचा सोलापूर विद्यापीठावर भव्य मोर्चा व बाईक रैली

Image
१५ सप्टेंबर रोजी धनगर समाजाचा सोलापूर विध्यापीठावर भव्य मोर्चा तसेच पंढरपूर ते सोलापूर विद्यापीठ भव्य बाईक रैली          -मा.विवेक कोकरे साहेब (यशवंत युवा सेना प्रमुख महाराष्ट्र राज्य)          वेळोवेळी आपल्या धडाकेबाज भाषणशैलीत पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करत यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्यचे यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी सोलापूर जिल्ह्यासह सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश भाग पिंजून काढला व सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव देण्यात यावे यासाठी १५ सप्टेंबर २०१७ रोजी धनगर समाजाचा सोलापूर विद्यापीठावर भव्य मोटारसायकल रैली व मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यातील अशी कितीतरी विद्यापीठे आहेत त्यांना महापुरूषांची नावे देण्यात आली आहेत पण जेव्हा धनगर समाजाच्या वतीने एखादी मागणी करण्यात येते तेव्हाच जातीयवाद कसा काय आडवा येतो.? याचा जाब विचारण्यासाठी यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य च्या वतीने सोलापूर विद्यापीठावर भव्य बाईक रैली व मोर्चाचे आयोजन केले आहे. २६ मे...

...तर भारत देश काय खाक विकास करणार??

Image
...तर भारत देश काय खाक विकास करणार?? हाडांची काडं झाली तरी चालत्याल पण पोरांनला साळा शिकवायची अशी आण घीऊनच माझा माय बाप शेतात राब राब राबतुया, घामाच्या धारा निथळायच्या नाहीत तवर कुठूनतरी पायात कचकन काटा घुसावा आणि भळाभळा लाल रगात निघावं. शेरडा-मेंढरामागं दगडा-धोंड्यातनं चालताना कधी ठ्याच लागत्या तर कधी काट्याकुट्यातनं चालताना तळपायातनं काटा घूसून आरपार निघतूया, कोण एखादा शेताचा मालक एखादं कोकरू-करडू शेतात गेलं  म्हणून माझ्या मेंढपाळ बांधवांना पार चाबकानं सोलून काढतुया, तरीपण सगळं मुकाट्यानं सहन करून पोटच्या लेकरांना शिकवायचं या इराद्यानंच माझं माय बाप रात्रंदिस झटक्यात. माझ्या मायबाची इच्छा काय असल तर ती म्हणजे पोरांनं चांगलं शिकावं, पोरांनं आयबापाचं नाव कमवावं, पोराला कुठंतरी सावलीतली आन् खुडचीवरची नवकरी मिळावी हीच माझ्या मायबापांची इच्छा. आम्ही उन्हातान्हात ऊन-वारा-पावसाचा इचार न करता झक मारतुया पण ही येळ आपल्या पोरांवर इवूनि बास एवढंच.... पण आजकाल पोरं चांगली शिकत्याती जरा बरं वाटतं, आम्ही मात्र भोगलं पण पोरांनला तरी चांगलं दिस येत्यालं असाच इचार करत करत पोरं दहावी, बारावी...

तुम्हास प्रगटदिनाच्या लक्ष्यावधी शुभेच्छा...

Image
आमचे बंधुतूल्य परममित्र युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब यांचे खंदे समर्थक व आटपाडी तालुक्याचे उगवते युवा नेतृत्व बनपुरी गावचे सुपूत्र मा.नवनाथ (दादा) काळे यांना प्रगटदिनाच्या हर्दिक हर्दिक शुभेच्छा. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐 जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत।। शुभेच्छूक,      *✍️नितीनराजे अनुसे✍️* अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली          +९१७६६६९९४१२३ nitinrajepublications.blogspot.com

विजय गावडे साहेबांना वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा

Image
धनगर समाजाचे जेष्ठ विचारवंत, एक अभ्यासू आणि संयमी व्यक्तिमत्व, धनगर समाजाच्या प्रश्नाचे गाढे अभ्यासक तथा सुप्रसिद्घ व्याख्याते आदरणीय विजय गावडे साहेब आपणास वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐 जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत।। शुभेच्छूक,      *✍️नितीनराजे अनुसे✍️* अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली          +९१७६६६९९४१२३ nitinrajepublications.blogspot.com

षड्यंत्र यशवंत युवा सेनेच्या बदनामीसाठी...

Image
आज २१ व्या शतकात जर कोणी यशाच्या मार्गावर जात असेल अथवा कोणी यश संपादन करत असेल तर कोण कोणाची आणि कशी बदनामी करेल ते सांगता येत नाही. एखाद्याने कितीही चांगले सामाजिक काम करू द्या पण ते चांगले सामाजिक काम जर एखाद्याला बघवले नाही तर चांगले काम करणाऱ्याची बदनामी केल्याशिवाय सोडत नाही मग त्या बदनामी करणाऱ्या  व्यक्तिने चांगले काम करायची गोष्ट तर फारच दूर... असो यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य ही संघटना ज्या उद्देशाने स्थापन केली त्याची विचारधारा ही क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेबांची असून स्वतंत्र संघटना स्थापन करण्याची काही कारणे देखिल आहेत. ज्या संघटनेत कलंकित वृत्तीची माणसं असतात आणि समाजाच्या डोक्यावर बसून माता बघिणींच्या अभ्रूचे धिंदोडे उडवतात पण अशा प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी घालून संघटना चालवणाऱ्यांपासून कोसो दूर राहण्यासाठी व बदनामी होण्यापासून सुरक्षित राहण्यासाठी आणि कोणताही दिखाऊपणा न करता निस्वार्थीपणाने समाजाच्या न्याय व हक्कासाठी युवकांच्या सर्व ताकदीनिशी यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेच...

वाढदिवस वर्गमित्रांचा...

Image
यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य चे कट्टर सैनिक, समाजकार्याची प्रचंड आवड असलेले आमचे बंधूतुल्य वर्गमित्र अनुक्रमे १)पुणे जिल्ह्यातील यशवंत युवा सेनेचे उगवते युवा नेतृत्व मा.विक्रमसिंह वाक्षे साहेब व २)महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ तथा युवकह्रदय  सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब यांचे विश्वासू सहकारी मा.राहूलभाई मुढे उर्फ किंगफिशर यांना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा. 💐🎉🎂🎉💐🎉🎂🎉💐 जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥ शुभेच्छूक,      *✍️नितीनराजे अनुसे✍️* अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली          +९१७६६६९९४१२३ nitinrajepublications.blogspot.com

संगमनेर तालुका प्रमुख पदी योगेश बिडगर यांची निवड

Image
काल दि. १ आॅगस्ट २०१७ रोजी यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्यच्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका प्रमुख या पदावर मा.योगेशजी बिडगर साहेब यांची नियुक्ती करण्यात आली. यशवंत युवा सेना ही एक धनगर समाजाच्या न्याय व हक्कासाठी लढणारी एकमेव क्रांतीकारी संघटना असून वंचितांच्या हक्कासाठी व वंचितांच्या न्यायासाठी लढा उभा करणारी संघटना स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या विचारधारेवर मार्गक्रमण करत आहे. मा.योगेशजी बिडगर हे एक समाजातील निष्ठावंत व समाजासाठी निस्वार्थीपणाने लढणारे झटणारे व झगडणारे युवा कार्यकर्ते आहेत. समाजासाठी निस्वार्थीपणाने कार्य करणाऱ्या समाजबांधवांना यशवंत युवा सेनेच्या माध्यमातून नेतृत्वाची संधी दिली जाते त्यातूनच धनगर समाजाचे नेतृत्व मजबूत व बलशाली बनते त्याचा फायदा हा विधानसभेतील व लोकसभेतील सदस्यांचा टक्का वाढवण्यासाठी होत असतो. यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांच्या आदेशानुसार यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य चे युवक प्रदेशाध्यक्ष राष्ट्रपती पुरस्कार विजेता युवा दिग्दर्शक मा.शरद गोयेकर (टिंग्या) यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेर तालुका प्रमुख पदी मा.योगेशजी बिडगर...