आरक्षण एक घटनादत्त अधिकार
आरक्षण हा आपला घटनादत्त अधिकार आहे आणि आरक्षण म्हटलं की आजकाल काही लोक सनातनी आणि बाजारबुणग्या बांडगुळांचे ऐकूण लंगड्यासाठी जशा कुबड्या असतात जणू तसाच काहीसा अर्थ काढतात आणि उगंच काहीतरी वाचाळ बडबड करत बसतात. आरक्षण म्हणजे समाजाच्या विकासासाठी वापरल्या जाणाऱ्या कुबड्या नसून भारतीय राज्यघटनेत समाजव्यवस्थेतील प्रत्येक जाती/जमातीला दिलेला घटनादत्त अधिकार आहे ही भावना सर्वांमध्ये रुजायला हवी. यासाठी भारतीय संविधानाची ओळख असणे फार गरजेचे आहे. खरंतर आरक्षणाची सुरवात ही देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून झाली नाही तर स्वातंत्र्यपूर्व काळात १८९३ मध्ये आरक्षणाचे जनक म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या छत्रपति राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षणाची सुरवात केली होती. त्याकाळी ब्राह्मणेत्तर मागासवर्गीयांना त्यांनी शिक्षण, शिष्यवृत्ती, नोकरी अशा विवीध क्षेत्रामध्ये ५०% आरक्षण लागू केले होते. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ९ मे १९१६ रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात "बाबासाहेब डॉ.अम्बेडकर वाङमय" नावाचा प्रबंध सादर केला होता. त्या वाङमय मधील खंड क्र.१ मध्ये "भारत में जात...