Posts

Showing posts from 2018

प्रस्तावना : प्राचार्य डॉ शिवाजी दळणर सर

Image
धनगर समाजाचे भीष्मपितामह भाई आमदार गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांच्या शुभहस्ते "पुन्हा एक नवी दिशा" या पुस्तकाचे प्रकाशन यशवंत महोत्सव मध्ये करण्यात आले. त्यावेळी उपस्थित मान्यवर माजी आमदार प्रकाश आण्णा शेंडगे, जहागीरदार अमरजितसिंह राजे बारगळ, मा.भुषणसिंह होळकर, प्राचार्य डॉ शिवाजी दळणर सर तसेच अन्य प्रमुख पाहुणे प्रस्तावना (पुन्हा एक नवी दिशा)         ✍️ प्राचार्य डॉ शिवाजी दळणर सर              पुन्हा एक नवी दिशा देत असताना आमचे समविचारी मित्र श्री नितीनराजे अनुसे यांनी धनगर समाजाच्या वेद काळापासून ते आजच्या अवस्थेचे चिंतन केले आहे. खरंतर धनगर हा वेदात मुळ निवासी गणला जातो. ही माणसं जंगलात गाणी गायची ती गाणी येथील ऋषीमुनींनी जशीच्या तशीच वेदात लिहून ठेवली आहेत. अर्थातच वेद म्हणजे धनगरांची गाणी आहेत. वेदात वनस्पती, प्राणी, झाडे, झुडपे यांची नावे देणारा मुळ पुरुष आर्थातच मुळ निवासी हा धनगरच होता. त्या काळी ऋषीमुनी औषधांची माहिती, शोध धनगरांच्या मदतीनेच घेत असे. वनस्पतींची ओळख सांगणारा...

अन् आईच्या डोळ्यात पाणी आलं....

Image
"पुन्हा एक नवी दिशा" हे माझे पहिले पुस्तक माझ्या आई-तात्यांना समर्पित       ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचे मी काहीतरी देणं लागतो म्हणून अंधकाराच्या खाईत भरकटलेल्या माझ्या भोळ्या भाबड्या समाजाचे  गेल्या तीन-चार वर्षापासून समाजप्रबोधन करतोय. सातत्याने समाजप्रबोधनपर लेखन चालूच आहे शिवाय कार्यक्रम देखिल त्यामुळे व्याख्याने, सत्कार, सन्मान हे साहजिकच होत राहणार. मुंबईला असताना एखादेवेळी कार्यक्रमासाठी गावाकडे आलो तर घरी बसायची कधी उसंत  नसायची सतत गडबड आणि पळापळ... हो मोठेपणा म्हणून सांगत नाही तर वस्तूस्थिती म्हणून सांगतोय. आई-तात्यांना समजायचं नाही की मी नक्की काय करतोय ते... पण कार्यक्रमात केलेल्या सन्मानाचा फेटा अथवा एखादे सन्मानचिन्ह हातात दिसले की त्यांना एवढंच समजायचे की मी  कुठेतरी कार्यक्रमाला जाऊन आलोय. पण घरी आल्यासारखं चहा-नाष्टा करण्यासाठी सुद्धा कधी कधी वेळ नसायचा जेवण तर दूरची गोष्ट त्यामुळे आई-तात्या चिडचिड करायचे. कधी कधी तर तात्या म्हणायचे सुद्धा की आपला धनगर समाज म्हणजी धनगरी जत्रा अन् कारभारी सत्रा अशातला प्रकार हाय.  कितीही...

लवकरच येत आहे सर्व वाचक रसिकांसाठी...

Image
समाजाच्या उज्वल भवितव्यासाठी - पुन्हा एक नवी दिशा        ज्याप्रमाणे अथांग समुद्रात एखादी नौका भरकटून जाते व मिळेल त्या दिशेने एखाद्या अंधासारखे जलविहार करत असते त्याचप्रमाणो दिशाहीन झालेल्या म्हणजेच भरकटलेल्या तथा विखूरलेल्या माझ्या भोळ्या - भाबड्या धनगर समाजाला , समाजातील नवयुवक - युवतींना दिशा दाखवण्यासाठी अर्थातच धनगर समाजाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी मी उचललेले पहिलेच पाऊल म्हणजेच “ पुन्हा एक नवी दिशा ” हे समाजप्रबोधनपर पुस्तक रविवार दि . १५ एप्रिल २०१८ रोजी प्रकाशित करत आहोत . आशा करतो की माझ्या जीवनातील हे माझे पहिलेच पुस्तक तुम्हाला आवडेल त्यातून समाजप्रबोधन व्हावे , समाज जागृतीला चालना मिळावी एवढीच प्रामाणिक अपेक्षा ... आपलाच , नितीनराजे अनुसे ( लेखक :- पुन्हा एक नवी दिशा ) प्रकाशन सोहळा : -        * यशवंत महोत्सव * स्थळ :- शाहू स्मारक भवन , दसरा चौक , कोल्हापूर वेळ :- रविवार दि . १५ एप्रिल २०१८ स . १० : ०० वाजता