होळकर कालीन बारव्यांच्या शोधात भाग-२
*पुनर्वसन व सुशोभिकरण* दि.२९ मे २०१७ रोजी राज्य महामार्ग क्र. १४३ मल्हारपेठ-पंढरपूर रोड वरती माणदेशातील सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यांतील निंबवडे गावाच्या ईशान्येकडील माण तालुक्याच्या हद्दीत असलेल्या होळकर कालीन बारव्याची मी तसेच यशवंत युवा सेनेचे कार्यकर्ते पप्पू शिंगाडे, सुमितराव मेटकरी व अतीश कोळेकर या सर्वांनी पाहणी केलीच होती. त्याबद्दल मी सविस्तरपणे होळकर कालीन बारव्याच्या शोधात भाग-१ मध्ये वर्णन केलेले आहे त्यानंतर दि.६ जून २०१७ रोजी त्याच राज्य महामार्ग क्र.१४३ मल्हारपेठ-पंढरपूर या मार्गावर आटपाडी तालुक्यांतील दिघंची या गावापासून झरे या गावाकडे जाताना दोन-तीन कि.मी. अंतरावर तशाच प्रकारचा पिंडीच्या आकाराचा होळकर कालीन बारवा पाहावयास मिळाला. सध्या त्या बारव्याची अवस्था अत्यंत बिकट स्वरूपाची असून हा बारवा पूर्णता पडझड झालेल्या अवस्थेत आहे. सध्या मी महाराष्ट्र राज्याबाहेर असल्याने मला काही शक्य झाले नाही परंतु माझे सहकारी मित्र दिघंची गावचे सुपूत्र अजय पाटोळे यांच्या माध्यमातून संबंधित बारव्याचे फोटो संकलित केले गेले आहेत ते खालील छायाचित्रांत पा...