होळकर कालीन बारव्यांच्या शोधात भाग-२

*पुनर्वसन व सुशोभिकरण*
दि.२९ मे २०१७ रोजी राज्य महामार्ग क्र. १४३ मल्हारपेठ-पंढरपूर रोड वरती माणदेशातील सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यांतील निंबवडे गावाच्या ईशान्येकडील माण तालुक्याच्या हद्दीत असलेल्या होळकर कालीन बारव्याची मी तसेच यशवंत युवा सेनेचे कार्यकर्ते पप्पू शिंगाडे, सुमितराव मेटकरी व अतीश कोळेकर या सर्वांनी पाहणी केलीच होती. त्याबद्दल मी सविस्तरपणे होळकर कालीन बारव्याच्या शोधात भाग-१ मध्ये वर्णन केलेले आहे


त्यानंतर दि.६ जून २०१७ रोजी त्याच राज्य महामार्ग क्र.१४३ मल्हारपेठ-पंढरपूर या मार्गावर आटपाडी तालुक्यांतील  दिघंची या गावापासून  झरे या गावाकडे जाताना दोन-तीन कि.मी. अंतरावर तशाच प्रकारचा पिंडीच्या आकाराचा होळकर कालीन बारवा पाहावयास मिळाला. सध्या त्या बारव्याची अवस्था अत्यंत बिकट स्वरूपाची असून हा बारवा पूर्णता पडझड झालेल्या अवस्थेत आहे. सध्या मी महाराष्ट्र राज्याबाहेर असल्याने मला काही शक्य झाले नाही परंतु माझे सहकारी मित्र  दिघंची गावचे सुपूत्र अजय पाटोळे यांच्या माध्यमातून संबंधित बारव्याचे फोटो संकलित केले गेले आहेत ते खालील छायाचित्रांत पाहावयास मिळतीलच.


रणरागिणी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी केवळ त्यांच्या इंदौर राज्यापुरताच मर्यादित राज्यकारभार केला नाही तर अखंड भारत देशभर त्यांनी विकासकामे केली. प्रशासन व्यवस्थेवर त्यांची चांगलीच जरब असायची. देशभर विकासकामे त्यांनी स्वताच्या खाजगीतूनच केली. मग त्यामध्ये काश्मिर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि द्वारकापासून आसाम पर्यंत सर्व धार्मिक स्थळांचे बांधकाम केले काहींचा जिर्णोध्दार केला मग त्यामध्ये मशिदी असो अथवा मंदिरे... राष्ट्रमाता महाराणी अहिल्याई होळकर यांनी सर्व ज्योतिर्लिंगाचा जिर्नोद्धार केला, नद्यांवरती घाट, विहीरी, शेततळे, तलाव, आश्रमशाळा, वाटसरूंसाठी धर्मशाळा, उपहारगृहे तसेच बारवे यांचे बांधकाम केले होते. त्यातीलच हा एक होळकर राज्यकालीन बारवा. दिघंची गावाजवळील हा बारवा पडझड झालेल्या अवस्थेत असून छायाचित्रांत पावसाच्या पाण्याने तुडूंब भरलेला दिसतो परंतू या बारव्यामध्ये पुर्नता मातीचा संचय झाला असल्याने दगडी बांधकाम केवळ गुडघाभरच निदर्शनास येथे. 


सामाजिक कार्यकर्ते मा.रामभाऊ लांडे साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून काही संस्थांच्या मदतीने या बारव्याचे पुनर्वसन करण्यात येणार आहे त्याचबरोबर यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य च्या वतीने यशवंत युवा सेना शाखा निंबवडे व दिघंची येथिल युवा कार्यकर्त्यांसह राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी बांधलेल्या ऐतिहासिक बारव्याचे सुशोभिकरणदेखील करण्यात येणार आहे.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
     *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
         +९१७६६६९९४१२३
nitinrajepublications.blogspot.com

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

धुळे येथे वनरक्षक बनलेत भक्षक, ७ सप्टेंबर ला मोर्चा

सोलापूर विद्यापीठ नामांतरण लढा यशस्वी, २५-५० लाख धनगरांचा उत्स्फूर्त सहभाग

प्रस्तावना : प्राचार्य डॉ शिवाजी दळणर सर