Posts

प्रस्तावना : प्राचार्य डॉ शिवाजी दळणर सर

Image
धनगर समाजाचे भीष्मपितामह भाई आमदार गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांच्या शुभहस्ते "पुन्हा एक नवी दिशा" या पुस्तकाचे प्रकाशन यशवंत महोत्सव मध्ये करण्यात आले. त्यावेळी उपस्थित मान्यवर माजी आमदार प्रकाश आण्णा शेंडगे, जहागीरदार अमरजितसिंह राजे बारगळ, मा.भुषणसिंह होळकर, प्राचार्य डॉ शिवाजी दळणर सर तसेच अन्य प्रमुख पाहुणे प्रस्तावना (पुन्हा एक नवी दिशा)         ✍️ प्राचार्य डॉ शिवाजी दळणर सर              पुन्हा एक नवी दिशा देत असताना आमचे समविचारी मित्र श्री नितीनराजे अनुसे यांनी धनगर समाजाच्या वेद काळापासून ते आजच्या अवस्थेचे चिंतन केले आहे. खरंतर धनगर हा वेदात मुळ निवासी गणला जातो. ही माणसं जंगलात गाणी गायची ती गाणी येथील ऋषीमुनींनी जशीच्या तशीच वेदात लिहून ठेवली आहेत. अर्थातच वेद म्हणजे धनगरांची गाणी आहेत. वेदात वनस्पती, प्राणी, झाडे, झुडपे यांची नावे देणारा मुळ पुरुष आर्थातच मुळ निवासी हा धनगरच होता. त्या काळी ऋषीमुनी औषधांची माहिती, शोध धनगरांच्या मदतीनेच घेत असे. वनस्पतींची ओळख सांगणारा, जंगलाच्या सानिध्यात राहणारा सर्वप्रथम मुळ निवासी धनगरच असल्याचे वेदात सांगितले आहे

अन् आईच्या डोळ्यात पाणी आलं....

Image
"पुन्हा एक नवी दिशा" हे माझे पहिले पुस्तक माझ्या आई-तात्यांना समर्पित       ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचे मी काहीतरी देणं लागतो म्हणून अंधकाराच्या खाईत भरकटलेल्या माझ्या भोळ्या भाबड्या समाजाचे  गेल्या तीन-चार वर्षापासून समाजप्रबोधन करतोय. सातत्याने समाजप्रबोधनपर लेखन चालूच आहे शिवाय कार्यक्रम देखिल त्यामुळे व्याख्याने, सत्कार, सन्मान हे साहजिकच होत राहणार. मुंबईला असताना एखादेवेळी कार्यक्रमासाठी गावाकडे आलो तर घरी बसायची कधी उसंत  नसायची सतत गडबड आणि पळापळ... हो मोठेपणा म्हणून सांगत नाही तर वस्तूस्थिती म्हणून सांगतोय. आई-तात्यांना समजायचं नाही की मी नक्की काय करतोय ते... पण कार्यक्रमात केलेल्या सन्मानाचा फेटा अथवा एखादे सन्मानचिन्ह हातात दिसले की त्यांना एवढंच समजायचे की मी  कुठेतरी कार्यक्रमाला जाऊन आलोय. पण घरी आल्यासारखं चहा-नाष्टा करण्यासाठी सुद्धा कधी कधी वेळ नसायचा जेवण तर दूरची गोष्ट त्यामुळे आई-तात्या चिडचिड करायचे. कधी कधी तर तात्या म्हणायचे सुद्धा की आपला धनगर समाज म्हणजी धनगरी जत्रा अन् कारभारी सत्रा अशातला प्रकार हाय.  कितीही सांगितलं समाजासाठी काही

लवकरच येत आहे सर्व वाचक रसिकांसाठी...

Image
समाजाच्या उज्वल भवितव्यासाठी - पुन्हा एक नवी दिशा        ज्याप्रमाणे अथांग समुद्रात एखादी नौका भरकटून जाते व मिळेल त्या दिशेने एखाद्या अंधासारखे जलविहार करत असते त्याचप्रमाणो दिशाहीन झालेल्या म्हणजेच भरकटलेल्या तथा विखूरलेल्या माझ्या भोळ्या - भाबड्या धनगर समाजाला , समाजातील नवयुवक - युवतींना दिशा दाखवण्यासाठी अर्थातच धनगर समाजाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी मी उचललेले पहिलेच पाऊल म्हणजेच “ पुन्हा एक नवी दिशा ” हे समाजप्रबोधनपर पुस्तक रविवार दि . १५ एप्रिल २०१८ रोजी प्रकाशित करत आहोत . आशा करतो की माझ्या जीवनातील हे माझे पहिलेच पुस्तक तुम्हाला आवडेल त्यातून समाजप्रबोधन व्हावे , समाज जागृतीला चालना मिळावी एवढीच प्रामाणिक अपेक्षा ... आपलाच , नितीनराजे अनुसे ( लेखक :- पुन्हा एक नवी दिशा ) प्रकाशन सोहळा : -        * यशवंत महोत्सव * स्थळ :- शाहू स्मारक भवन , दसरा चौक , कोल्हापूर वेळ :- रविवार दि . १५ एप्रिल २०१८ स . १० : ०० वाजता

आजच Nitinraje Anuse नावाचे फेसबुक पेज लाइक करा

Image
गेल्या दोन-तीन महिन्यापूर्वीच माझ्या फेसबुक खात्याची 5000 (पाच हजार) मैत्रीसाठी विनंतीची मर्यादा पूर्ण झाली आहे. त्यामुळे उर्वरित मित्रत्वासाठी आलेल्या विनंत्या मी स्विकारू शकत नाही. शक्य झाल्यास एखाद्या चुकीचे संदेश पाठवणाऱ्या अथवा गैरवर्तणूक करणाऱ्या फेसबुक खातेदारास यादीमधून काढल्यानंतर नक्कीच विनंती स्विकारून मित्रत्वाच्या यादीत सामाविष्ट केले जाईल. तुर्तास खालील  दुवा (Link)  वापरून माझे Nitinraje Anuse हे फेसबुक पेज ला लाइक करून अद्यवते (updates) मध्ये रहा. https://m.facebook.com/nitinrajeanuse123/?ref=bookmarks -नितीनराजे अनुसे (7666994123) अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली nitsanuse123@gmail.com

आरक्षण एक घटनादत्त अधिकार

Image
आरक्षण हा आपला घटनादत्त अधिकार आहे आणि आरक्षण म्हटलं की आजकाल काही लोक सनातनी आणि बाजारबुणग्या  बांडगुळांचे ऐकूण लंगड्यासाठी जशा कुबड्या असतात जणू तसाच काहीसा अर्थ काढतात आणि उगंच काहीतरी वाचाळ बडबड करत बसतात. आरक्षण म्हणजे समाजाच्या विकासासाठी वापरल्या जाणाऱ्या कुबड्या नसून भारतीय राज्यघटनेत समाजव्यवस्थेतील प्रत्येक जाती/जमातीला दिलेला घटनादत्त अधिकार आहे ही भावना सर्वांमध्ये रुजायला हवी. यासाठी भारतीय संविधानाची ओळख असणे फार गरजेचे आहे. खरंतर आरक्षणाची सुरवात ही देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून झाली नाही तर स्वातंत्र्यपूर्व काळात १८९३ मध्ये आरक्षणाचे जनक म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या छत्रपति राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षणाची सुरवात केली होती. त्याकाळी ब्राह्मणेत्तर मागासवर्गीयांना त्यांनी शिक्षण, शिष्यवृत्ती, नोकरी अशा विवीध क्षेत्रामध्ये ५०% आरक्षण लागू केले होते. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ९ मे १९१६ रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात "बाबासाहेब डॉ.अम्बेडकर वाङमय" नावाचा प्रबंध सादर केला होता. त्या वाङमय मधील खंड क्र.१ मध्ये "भारत में जात

धुळे येथे वनरक्षक बनलेत भक्षक, ७ सप्टेंबर ला मोर्चा

Image
एकतर शेळ्या मेंढ्यांसाठी असलेली चराऊ कुरणे सरकारने आपल्यात घशात घातली वरून वनरक्षकांचा नंगानाच चालू आहे. अर्थातच तोंड दाबून बुक्क्यांचा मार दिला जातोय. असाच प्रकार घडलाय धुळे जिल्ह्यातील हडसुणे येथे दि.१६आॅगस्ट २०१७ रोजी चिंतामण धोंडीराम ठेल्लारी या धनगर बांधवास वनरक्षकाने व त्याच्या १२ ते १५ सहकाऱ्यांनी/अधिकाऱ्यांनी मिळून बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करून त्याचा मोबाईल देखिल तोडून टाकला आहे. याशिवाय त्या प्रसंगी इतर कोणी नसताना देखिल अन्य १७ समाजबांधवांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा खोटा गुन्हा दाखल करून अटक सुद्धा केली आहे. चिंचामण ठेल्लारी यांची वैध्यकीय तपासणी केली असता त्यांना बेदम अमानुष मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील धनगर समाजबांधवांनी दि.२८ आॅगस्ट रोजी वनपाल व वनरक्षकांच्या निषेधार्थ बैठक घेतली होती त्यामध्ये ७ सप्टेंबर २०१७ रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. एकीकडे कोट्यवधी धनगर एका झेंड्याखाली अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी एकत्रित येत आहेत हे माहित असताना देखिल वनरक्षकांची/वनपालांची एवढी मस्ती कोणामुळे वाढ

सोलापूर विद्यापीठ नामांतरण लढा यशस्वी, २५-५० लाख धनगरांचा उत्स्फूर्त सहभाग

Image
सोमवार दि.२८ आॅगस्ट २०१७ ला झालेला सोलापूर विद्यापीठ नामांतरण लढा खरोखर यशस्वी झाला. २१ जुलै २०१४ च्या मोर्चा नंतर सरकारला धनगर समाजाची ताकद पुन्हा एकदा कळाली. २५-५० लांखाच्या संख्येने धनगर समाजाचा मोर्चा सोलापूरात घोषणा देत सरकारचा निषेध करत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. तिथे अनेक मान्यवरांची भाषणे झाली. सोलापूर विद्यापीठाला लवकरात लवकर राष्ट्रमाता अहिल्याईंचे नाव द्यावे असे शासनाला आठ दिवसांचे अल्टिमेटम दिले आहे अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अखंड धनगर समाजाने दिला आहे. आणि सरकारला काहीही करून सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव द्यावेच लागेल यात काही वादच नाही. या लढ्यात धनगर समाज सर्व ताकदीने रस्त्यावर उतरला आणि सोलापूर शहर पिवळ्या भंडाऱ्यात न्हाऊन निघाले. सर्व माता-भगिनी, समाजबांधव भर पावसात भिजत आंदोलनात उभे होते. जेव्हा काल रात्री मी स्वता "ही तर येणाऱ्या वादळाची पूर्वसुचना आहे" या आशयाचा पहिला ब्लाॅग लिहला  त्यामध्ये कोणत्याही व्यक्तीचे नाव व पद वापरले नव्हते. केवळ धनगर समाजाच्या नेतृत्वामुळेच अहिल्या कन्यांमुळे आणि तुम्ह