धुळे येथे वनरक्षक बनलेत भक्षक, ७ सप्टेंबर ला मोर्चा
एकतर शेळ्या मेंढ्यांसाठी असलेली चराऊ कुरणे सरकारने आपल्यात घशात घातली वरून वनरक्षकांचा नंगानाच चालू आहे. अर्थातच तोंड दाबून बुक्क्यांचा मार दिला जातोय. असाच प्रकार घडलाय धुळे जिल्ह्यातील हडसुणे येथे दि.१६आॅगस्ट २०१७ रोजी चिंतामण धोंडीराम ठेल्लारी या धनगर बांधवास वनरक्षकाने व त्याच्या १२ ते १५ सहकाऱ्यांनी/अधिकाऱ्यांनी मिळून बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करून त्याचा मोबाईल देखिल तोडून टाकला आहे. याशिवाय त्या प्रसंगी इतर कोणी नसताना देखिल अन्य १७ समाजबांधवांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा खोटा गुन्हा दाखल करून अटक सुद्धा केली आहे. चिंचामण ठेल्लारी यांची वैध्यकीय तपासणी केली असता त्यांना बेदम अमानुष मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील धनगर समाजबांधवांनी दि.२८ आॅगस्ट रोजी वनपाल व वनरक्षकांच्या निषेधार्थ बैठक घेतली होती त्यामध्ये ७ सप्टेंबर २०१७ रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. एकीकडे कोट्यवधी धनगर एका झेंड्याखाली अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी एकत्रित येत आहेत हे माहित असताना देखिल वनरक्षकांची/वनपालांची एवढी मस्ती कोणामुळे वाढते आहे की अंगावर चढवलेल्या वर्दीमुळे? याचे पारिपत्य करायलाच हवे. एकीकडे सरकार कायदे बनवताना सरकारी कामात अडथळा आणला तर गुन्हे दाखल करणार असल्याचे कायदे बनवत आहे परंतू कायद्याचे रक्षक मात्र या कायद्याचा गैरवापर करून धनगर समाजावर असा अन्याय अत्याचार करत आहेत. शासनाने वेळीच अशा हरामखोरांना शिक्षा करावी आणि जर तसे होत नसल्यास त्याला धनगर समाजाच्या ताब्यात द्या आम्ही आमच्या पद्धतीने त्याचे पारिपत्य करतो. शासकीय कर्मचारी जर कायद्याचा गैरवापर करून विनाकारण धनगर समाजावर अन्याय अत्याचार करत असतील तर धनगर समाजाला स्वताचे कायदे बनवावे लागतील तेव्हा ना रहेगा बास ना बजेगी बांसरी या म्हणीची उकल होईल त्यासाठी बोरगावचा ढाण्या वाघ बापू बिरू वाटेगावकर यांचा इतिहास वाचा मग समजेल.
*गुरूवार दि.७ सप्टेंबर २०१७ रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघाच्या वतीने मोर्चाचे आयोजित करण्यात आला असून सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे*. अन्यथा उद्या ही वेळ तुमच्यावर देखिल येऊ शकते याचे भान राखावे.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
आपलाच,
*✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+९१७६६६९९४१२३
nitinrajepublications.blogspot.com
*गुरूवार दि.७ सप्टेंबर २०१७ रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघाच्या वतीने मोर्चाचे आयोजित करण्यात आला असून सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे*. अन्यथा उद्या ही वेळ तुमच्यावर देखिल येऊ शकते याचे भान राखावे.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
आपलाच,
*✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+९१७६६६९९४१२३
nitinrajepublications.blogspot.com
Comments
Post a Comment