वाढदिवस आज विचारधारेचा...

राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी देखिल तेव्हा सांगितले होते  की इतरांनी अंधारात  केलेली कामं ही उजेडात (समोर) येतात पण आमच्या लोकांनी उजेडात केलेली कामं ही कायम अंधारातच राहतात. म्हणून आमच्या लोकांनी उजेडात जी काही कामं केली आहेत पण ठराविक व्यवस्थेमुळे ती कायम अंधारातच राहीली ती उजेडात यावीत समाजासमोर यायला हवीत आणि अख्ख्या जगाला कळवावीत आणि हेच एकमेव ध्येय ठेऊन एकेकाळी राजा जमात असलेल्या धनगर समाजाचा इतिहास जगासमोर यावा, समाजातील नेत्यांनी केलेली समाजोपयोगी लोकोपयोगी कामे ही लोकांसमोर यावीत, समाजाचे प्रश्न सरकार दरबारी जावेत व त्यांना न्याय मिळावा. राजकारणापासून सत्ताकारणापासून उपेक्षित असलेल्या समाजाला न्याय मिळावा, मेंढपाळांचा आक्रोश सत्तापिपासू लोकांच्या कानात गुंजावा, स्व.बी.के.कोकरे साहेबांनी ज्या आरक्षणाच्या चळवळीला जन्म दिला ती चळवळ मजबूत व्हावी, समाजात जागृती होऊन समाजात एकी व्हावी, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा नुसता उपदेश न राहता त्याचे अनुकरण समाजबांधवांनी करावे म्हणून समाजप्रबोधनाच्या माध्यमातून समाज जागृती आणि एकी व्हावी म्हणून ज्या ध्येय्यवेड्या तरूणाने सर्वप्रथमता "घोंगडी" मासिकाची सुरवात केली व तद्नंतर त्याचे रूपांतर साप्ताहिक घोंगडी मध्ये केले अशा ध्येय्यवेड्या तरूणाचा, निस्वार्थीपणाने समाजकार्य करणाऱ्या एका विचारधारेचा आज वाढदिवस त्याबद्दल साप्ताहिक घोंगडीचे संपादक व यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य चे आमचे लाडके मार्गदर्शक मा.बंडू खांडेकर साहेब यांना वाढदिवसाच्या हर्दिक हर्दिक शुभेच्छा.
तुमच्या जीवनातील यशाचा आलेख असाच वाढत राहो त्याचप्रमाणे तुमच्यासारख्या ध्येयवेड्या सामाजिक कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभो त्याचप्रमाणे तुमच्या हातून असेच अविरतपणे समाजकार्य घडो.
याच छोट्याशा हर्दिक हर्दिक शुभेच्छा.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
     *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
         +९१७६६६९९४१२३
nitinrajepublications.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोलापूर विद्यापीठ नामांतरण लढा यशस्वी, २५-५० लाख धनगरांचा उत्स्फूर्त सहभाग

लवकरच येत आहे सर्व वाचक रसिकांसाठी...

आरक्षण एक घटनादत्त अधिकार