समाजाच्या न्याय व हक्कासाठीच यशवंत युवा सेना : शरद गोयेकर (टिंग्या)

समाजाच्या न्याय व हक्कासाठीच यशवंत युवा सेना ही एकमेव क्रांतीकारी संघटना झटत व झगडत असून अन्याय व अत्याचाराच्या विरोधात असूड भिरकवण्यासाठीच या संघटनेचा जन्म झाला आहे. समाजाचे क्रांतीसुर्य स्व.बी.कोकरे साहेब यांचा वसा आणि वारसा घेऊन त्यांची विचारधारा जोपासण्याचे व स्व.बी.के.कोकरे साहेबांनी उभा केलेली चळवळ पुढे घेऊन जाण्याचे कार्य हे यशवंत युवा सैनिक  यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली करत आहेत. गेल्या ७० वर्षापासून धनगर समाजावर अन्याय आणि अन्यायच झाला पण त्याचा तमाशा बघण्याचे काम केवळ प्रस्थापित व्यवस्थेने केले आणि त्याला खतपाणी घालण्याचे काम माझ्याच समाजातील समाजाचे भांडवलीकरण करणाऱ्या भांडवलदारांनी केले पण आता इथून पुढे ते शक्य नाही कारण गावागावातील, वाड्यावस्त्यावरील युवक आता अन्यायच्या विरोधात पेटून उठलेला आहे आणि हाच पेटून उठलेला युवक अन्याय करणाऱ्या औलादींना पेटवून टाकणार आहे हे मात्र निश्चित...
धनगर समाजाला आपल्या हक्काचे आरक्षण आज ना उद्या नक्कीच मिळेल पण जरी धनगर समाजाला आरक्षणाची चौकट उघडी करून दिली तरी त्याचा लाभ धनगर समाजातील माझ्या किती मेंढपाळ बांधवांना होणार आहे याचं गणित तुम्हीच तयार करा. डोंगरदऱ्यातून, रानावनातून भटकंती करणारा माझा भोळा भाबडा धनगर समाज या प्रवाहात यायला खरंतर फार वेळ लागणार आहे पण आज धनगर समाजातील बांधवांसाठी ज्या काही शासकीय योजना आखल्या जातात त्या माझ्या मेंढपाळ बांधवांपर्यंत पोहचतात का हो? मग शेळी-मेंढीपालन असो अथवा कोणत्याही योजना असोत त्या माझ्या मेंढपाळ बांधवांपर्यंत पोहचायच्या अगोदरच गायब होतात. असे होऊ नये म्हणूनच यशवंत युवा सेना ही क्रांतीकारी संघटना समाजातील तळागळापर्यंत सरकारी योजना पोहचवायचं काम करणार आहे. आज पाहता ६० ते ७०% धनगर समाज हा भटकंती करतो पण जर आरक्षण मिळाले तर या ६० ते ७०% मेंढपाळ बांधवांना आणि त्यांच्या मुला मुलींनी याचा लाभ घेता येणार नाही म्हणून त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या भविष्यासाठी यशवंत युवा सेना ही जोमाने कार्य करत आहे आणि मला गरज आहे ती फक्त तुमच्या सहकार्याची. लवकरच यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य भर प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यांतील पदांची नियुक्ती करणार आहे तरी समाजासाठी निस्वार्थीपणाने झटणाऱ्या, झगडणाऱ्या समाजबांधवांनी हातात हात देऊन समाजाचा विकास करण्यासाठी यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी एकत्रित यावे. यशवंत युवा सेना ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या अथवा कोणत्या नेत्यांच्या बांधिलकीत नसून ती एक समाजासाठी स्वतंत्रपणे लढणारी क्रांतीकारी संघटना आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री कधीही कोणावरती अन्याय अत्याचार होत असेल तर कधीही हाक द्या आम्ही तुमच्या सोबत आहोत.
यशवंत युवा सेना या संघटनेत ज्यांना कार्य करण्याची इच्छा आहे त्यांनी माझ्या खालील क्रमांकावर संपर्क करा.
     *-मा.शरद गोयेकर (टिंग्या)*
*राष्ट्रपती पुरस्कार विजेता, युवा दिग्दर्शक*
   *युवकप्रदेशाध्यक्ष यशवंत युवा सेना*
     *संपर्क क्र. 8888716600*

Comments

Popular posts from this blog

धुळे येथे वनरक्षक बनलेत भक्षक, ७ सप्टेंबर ला मोर्चा

सोलापूर विद्यापीठ नामांतरण लढा यशस्वी, २५-५० लाख धनगरांचा उत्स्फूर्त सहभाग

प्रस्तावना : प्राचार्य डॉ शिवाजी दळणर सर