...तर भारत देश काय खाक विकास करणार??
...तर भारत देश काय खाक विकास करणार??
हाडांची काडं झाली तरी चालत्याल पण पोरांनला साळा शिकवायची अशी आण घीऊनच माझा माय बाप शेतात राब राब राबतुया, घामाच्या धारा निथळायच्या नाहीत तवर कुठूनतरी पायात कचकन काटा घुसावा आणि भळाभळा लाल रगात निघावं. शेरडा-मेंढरामागं दगडा-धोंड्यातनं चालताना कधी ठ्याच लागत्या तर कधी काट्याकुट्यातनं चालताना तळपायातनं काटा घूसून आरपार निघतूया, कोण एखादा शेताचा मालक एखादं कोकरू-करडू शेतात गेलं म्हणून माझ्या मेंढपाळ बांधवांना पार चाबकानं सोलून काढतुया, तरीपण सगळं मुकाट्यानं सहन करून पोटच्या लेकरांना शिकवायचं या इराद्यानंच माझं माय बाप रात्रंदिस झटक्यात. माझ्या मायबाची इच्छा काय असल तर ती म्हणजे पोरांनं चांगलं शिकावं, पोरांनं आयबापाचं नाव कमवावं, पोराला कुठंतरी सावलीतली आन् खुडचीवरची नवकरी मिळावी हीच माझ्या मायबापांची इच्छा. आम्ही उन्हातान्हात ऊन-वारा-पावसाचा इचार न करता झक मारतुया पण ही येळ आपल्या पोरांवर इवूनि बास एवढंच....
पण आजकाल पोरं चांगली शिकत्याती जरा बरं वाटतं, आम्ही मात्र भोगलं पण पोरांनला तरी चांगलं दिस येत्यालं असाच इचार करत करत पोरं दहावी, बारावीतून पुढं ग्रॅजुएट/पोस्ट ग्रॅजुएट झाली तरी कुठंच नवकरी मिळत नाय. पाण्यासारखा पैका वतून पोराला इंजिनीयर केला डाकतर बनवला पण त्याच्या डीग्रीला कोण काळं कुत्रं बी खाईना झालंय. मग करून करून भागलं अन् देवपुजेला लागलं असंच म्हणावं अशी पोरं आणि पोरांचं आयबाप देवाला नवसं करत बसत्यात तर कायजन MPSC/UPSC च्या मार्गावर जात्यात पण परक्षा देत देतच आर्ध आयुष्य निघून जातं मग कुठंतरी नाइलाजानं टेम्परवारीत ननकरी करून लग्नाला उभं राहावं लागतं. एखाद्या पोराला कुठंतरी कंपनीत नवकरी मिळाली तर ते कंपनीवाले त्याला सात-आठ हजार रूपय महिन्याला दितू म्हणत्यात मग त्याला शिकायला वरसाला लाखभर रूपय भरून काय फायदा??? मग वाटतं की त्या भानगडीत पडण्यापेक्षा दोन-चार शेरडं-मेंढरं घिउन दिली असती तर घरचं बघत बघत पोरांनं २५-३० हजार रुपय महिन्याचं सोडलं नसतं?? सरकार म्हणतंय पोरांनला शिकवा, साळंत घाला आपल्या देशाची परगती हुईल. कशाची परगती आण् कशाचं काय?? लाख लाख रुपय खर्चून पोरांनला शिकवायचं तरी कुठं नवकरी नाय मिळत म्हटल्यावर घरात आय पोराला जिवू घालंना आण् बा भिक मागू दी ना. अशी अवस्था त्या ऐन इस पंचिसीतल्या पोरांची हुतिया मग त्या पोरांनी नेमकं करायचं काय??
एखादा दहावी-बारावीतूनच आर्मीत भरती व्हूतुया मग तो गावाकडं सुट्टीला आल्यावर सगळी त्याचीच हावा. परत्येजण त्यालाच किंमत दितूय पण बाकीची डीग्री करूनपण घरात बसत्यात त्यांनला कोण इचारतच नाय. एखादा अडाणी पोरगा इवून म्हणतूच की लगा अजून कुठवर शिकतुया ??? आमुक-आमक्याचा पोरगा मायंदाळ कमवतुय मग तुझं कसं गा?? तु मोठा साह्यब व्हूनार वाटतंय?? शिक शिक आजून शिक... आसं म्हणल्यावर त्या ग्रॅजुएट/ पोस्टग्रॅजुएट झालेल्या पोराला कसं वाटत आसल बरं?? पोरींचं एक बरं आसतंय नाय शिकली तर नात्यामधीच कुठंतरी पाहुण्याच्या घरात दिवून टाकायची आण शिकून पण नवकरी मिळंना तर एखादा चांगला नवकरीवाला पसंत करतूच करतू. पण पोरांचं काय?? दोन रूपय कमवत असला तर नकटी काळी-बेंद्री कसलीतरी भेटलच भेटल पण दोन रूपय कमवायला कुठं नवकरीच मिळंना तर कोणी पोरगी बी देत नाय?? चाळणीत पाणी घिउन जीव देवू वाटत असतो पण असल्या दुष्काळात तेवढं पाणी तरी आणायचं कुठनं?? या भयानक दुष्काळात पाण्याची बोंब असली की साधं प्यायला पाणी मिळत नाय मग शेताला कुठनं आणायचं, शेतात कसं पिकवायचं आण् खायचं तरी काय?? पोरांनला शिकून नवकरी नाय मग तर दुष्काळात तेरावा महिना. खायची तोंडं वाढली पण कमवायला मात्र एकच बाप. मग त्या बिचाऱ्या शेतकऱ्याला आत्महत्या करायची येळ येणार नाय ??
भारत सरकारने, महाराष्ट्र सरकारने आतातरी विचार करायला हवा की सुशिक्षित बेरोजगारांची संख्या महाराष्ट्र राज्यात वाढत चालली आहे. औद्योगिक कंपन्या, उद्योगधंदे, फिल्म इंडस्ट्रीज यांसारख्या ठिकाणी नुसता जातीयवाद चाललेला आहे, पैसेवाल्यांची मुलं त्याठिकाणी भरती होतात पण या जगाच्या पोशिंद्यांच्या मुलांना मात्र न्याय मिळत नाही. शिक्षणसम्राटांची आणि त्यांच्या पाहुण्याराउळ्यांची पोरं मात्र त्यांच्याच एज्युकेशन सोसायटीमद्ये नोकऱ्या करतात मात्र शेतकऱ्यांच्या पोराला तिथे नोकरी मिळवायची म्हटलं तर दहा-बारा लाख रुपये मोजावे लागतात ही महाराष्ट्र राज्यातील वस्तूस्थिती आहे. मग त्या शिक्षण सम्राटांच्या शेंबड्या पोरांचा वाढदिवस असो नाहीतर त्यांच्या पोरींची लग्नं असो त्या संस्थेत काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पोरांचे पगार कापले जातात हे महाराष्ट्र राज्यातलं कटू सत्य आहे. त्यासाठी व्यवस्था बदलायला पाहिजे. आज महाराष्ट्र राज्यातल्या कित्येक कंपन्या गुजरातला शिफ्ट करून महाराष्ट्र राज्यातील युवकांवरती बेकारी ओढवली जातेय मात्र त्याविरोधात कोणी महाराष्ट्र राज्यातला एकही नेता ब्र काढत नाही ही महाराष्ट्र राज्याची शोकांतिका म्हणावी लागेल. आज अब्जावधी रूपयांची उलाढाल करणाऱ्या कित्येक कंपन्या सुशिक्षित तरूणांना तटपुंज्या पगारात दिवसरात्र राबवून घेतात, कंपनीचे एमडी मात्र करोडो रूपयांच्या अलिशान गाडीतून फिरतात आणि ज्यांच्या जीवावर या कंपन्या चालतात ती शेतकऱ्यांची पोरं मात्र खचाखच भरलेल्या बसमद्ये ट्रेनमद्ये लटकून प्रवास करतात आणि एखाद्याचा चुकून धक्का लागला तर पटरीवर पडून ट्रेनखाली सापडून मरून जातात. पण खरं संकट कोसळतं ते माझ्या शेतकऱ्यांच्या घरावर... त्या कंपनीवाल्यांना याचं काही सोयरसुतक नसतं.. कारण त्याच्याऐवजी त्याच्यासारखाच दुसरा कोणीतरी शेतकऱ्यांचा पोरगा सात-आठ हजारांच्या नोकरीसाठी इंटरव्युव्ह द्यायला लाइनमद्ये उभा असतो. शेतीवरती आणि उद्योगधंद्यांवरती देशांचा विकास अवलंबून असतो पण जर उद्याच्या भारताचं भविष्य म्हणून ज्यांच्याकडे बघितले जाते ते "अनमोल" धन जर देशाच्या विकासासाठी शिल्लक राहत नसेल तर भारत देश काय खाक विकास करणार आहे का??
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+९१७६६६९९४१२३
nitinrajepublications.blogspot.com

Comments
Post a Comment