उपजिल्हाप्रमुख सांगर मलगुंडे ढाण्या वाघाच्या भेटीला

यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य या क्रांतीकारी संघटनेचे सांगली जिल्हा उपप्रमुख मा.सागर (दादा) मलगुंडे यांनी कृष्णाकाठच्या भयावह पर्वाचा मानकरी असलेल्या बोरगावचा ढाण्या वाघ बापु बिरू वाटेगावकर उर्फ आमचे लाडके आप्पा यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. आप्पांच्या गुडघ्यांवर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया केली होती त्यामुळे सध्या आप्पा आपल्याच घरी बोरगाव (वाळवा) जि.सांगली येथे आराम करत आहेत. यशवंत युवा सेना सांगली जिल्ह्याचे  उपप्रमुख मा.सागर (दादा) मलगुंडे तसेच यशवंत युवा सेनेचे अनेक सक्रीय कार्यकर्त्यांनी भेट घेऊन विचारपूस केली.  आप्पांनीही विचारपूस करण्यासाठी आलेल्या मा.सागर (दादा) मलगुंडे यांना सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. मा.सागर (दादा) मलगुंडे हे नुकतेच उपजिल्हाप्रमुख पदावर नियुक्त झाले असून त्यांची निवड यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब व सांगली जिल्हा प्रमुख मा.पै.राहूल रूपनर यांच्या उपस्थितीत करण्यात आली तर यशवंत युवा सेनेचे सरचिटणीस ॲड.रविकिरण कोळेकर यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले. यशवंत युवा सेना संघटना ही यशवंत युवा सेना प्रमुख मा.विनेक कोकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असून सांगली जिल्ह्याचे प्रमुख मा.पै.राहूल रूपनर साहेब तसेच उपप्रमुख मा.सागर (दादा) मलगुंडे यांनी यशवंत युवा सेनेच्या विस्तार वाढवण्याचे कार्य अविरतपणे चालू ठेवले असून बोरगावचा ढाण्या वाघ म्हणून महाराष्ट्र राज्यभर ओळखल्या जाणाऱ्या बापू बिरू वाटेगावकर अर्थातच आप्पांनी त्यांना समाजाला एकत्रित करण्यासाठी अगणित शुभेच्छा दिल्या आहेत त्यामुळे यशवंत युवा सेनेचे कार्यकर्ते अजूनच सक्रीय होत चालले आहेत.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
     *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
         +९१७६६६९९४१२३
nitinrajepublications.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

धुळे येथे वनरक्षक बनलेत भक्षक, ७ सप्टेंबर ला मोर्चा

सोलापूर विद्यापीठ नामांतरण लढा यशस्वी, २५-५० लाख धनगरांचा उत्स्फूर्त सहभाग

प्रस्तावना : प्राचार्य डॉ शिवाजी दळणर सर