१५ सप्टेंबर २०१७ रोजी धनगर समाजाचा सोलापूर विद्यापीठावर भव्य मोर्चा व बाईक रैली

१५ सप्टेंबर रोजी धनगर समाजाचा
सोलापूर विध्यापीठावर भव्य मोर्चा तसेच
पंढरपूर ते सोलापूर विद्यापीठ भव्य बाईक रैली
         -मा.विवेक कोकरे साहेब
(यशवंत युवा सेना प्रमुख महाराष्ट्र राज्य)
         वेळोवेळी आपल्या धडाकेबाज भाषणशैलीत पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करत यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्यचे यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी सोलापूर जिल्ह्यासह सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश भाग पिंजून काढला व सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव देण्यात यावे यासाठी १५ सप्टेंबर २०१७ रोजी धनगर समाजाचा सोलापूर विद्यापीठावर भव्य मोटारसायकल रैली व मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यातील अशी कितीतरी विद्यापीठे आहेत त्यांना महापुरूषांची नावे देण्यात आली आहेत पण जेव्हा धनगर समाजाच्या वतीने एखादी मागणी करण्यात येते तेव्हाच जातीयवाद कसा काय आडवा येतो.? याचा जाब विचारण्यासाठी यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य च्या वतीने सोलापूर विद्यापीठावर भव्य बाईक रैली व मोर्चाचे आयोजन केले आहे. २६ मे २०१६ रोजी सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याईंचे नाव देणार असल्याची तत्वता मान्यता दिली पण त्याची अंमलबजावणी का होत नाही?  राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी केवळ धनगर समाजासाठी विकासकामे केली नाहीत, केवळ धनगर समाजासाठी राजकारभार केला नाही केवळ धनगर समाजासाठी प्रशासन चालवले नाही तर अखंड हिंदूस्थानात त्यांनी विकासकामे केली आहेत ती देखिल जाती धर्माच्या पलिकडे जाऊन. मग अन्य विद्यापीठांना महापुरूषांची नावे देण्यात येतात मात्र ज्या राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचा आदर्श अख्ख्या जगाने घेतला ज्या राष्ट्रमाता अहिल्याई होळकर उत्तम प्रशासन चालवणाऱ्या जगातील एकमेव राजकर्त्या होऊन गेल्या ज्यांच्या प्रशासन आणि राजकारभाराचा आदर्श आजही समोर ठेऊन अनेक राष्ट्रं प्रगतीपथावर पोहचली त्या राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव सोलापूर विद्यापीठाला द्यायला सरकारच्या पोटात का दुखतंय कोणास ठाऊक?
पण धनगर समाज आता शांत बसणार नाही जातीयवादी सरकारचा जाहिर निषेध करत शुक्रवार दि १७ सप्टेंबर २०१७ रोजी यशवंत युवा सेना आयोजित सोलापूर विद्यापीठाचे नामकरण केल्याशिवाय माघार घेणार नाही हा पवित्रा ठेऊनच धनगर समाजबांधवांनी लाखोंच्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी केले आहे.
कोण म्हणतंय नाव देत नाय
सोलापूर विद्यापीठाला अहिल्याईंचे
नाव लावल्याशिवाय आता आम्ही शांत बसत नाय.
एक धनगर लाख सिकंदर
लाख सिकंदर आले तरी त्यांना पुरून उरणाऱ्या धनगरांचे आम्ही वारसदार आहोत त्यामुळे माघार घेणे आमच्या रक्तात नाही.
बाईक रैली :- पंढरपूर -मोहोळ मार्गे-सोलापूर विद्यापीठ.
वार शुक्रवार
दि.१५ सप्टेंबर २०१७
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
          +९१७६६६९९४१२३
nitinrajepublications.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

धुळे येथे वनरक्षक बनलेत भक्षक, ७ सप्टेंबर ला मोर्चा

सोलापूर विद्यापीठ नामांतरण लढा यशस्वी, २५-५० लाख धनगरांचा उत्स्फूर्त सहभाग

प्रस्तावना : प्राचार्य डॉ शिवाजी दळणर सर