दोन्ही मोर्चासंदर्भात यशवंत युवा सेनेची भुमिका
एकदा नव्हे तर दोनदा केवळ समाजातील अन्य मोर्चामुळे नियोजन लांबवून १५ सप्टेंबर २०१७ रोजीची यशवंत युवा सेनेच्या वतीने भव्य मोटारसायकल रैली व मोर्चा हे ९ आॅगस्ट रोजी जाहिर केले असताना व ही भव्य मोटारसायकल रैली पुर्यनियोजित असताना देखिल काल दि. ११ आॅगस्ट २०१७ रोजी सोलापूर येथे सोलापूर विद्यापीठाच्या निषेधार्थ मोर्चाच्या संदर्भात बैठक पार पडली. १५ सप्टेंबर २०१७ ला भव्य मोटारसायकल काढण्यात येणार असल्याची माहिती असून देखिल सदरचा मोर्चा हा बुधवार दि.२३ आॅग्स्ट २०१७ रोजी सोलापूर विद्यापीठावर काढण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले यातून समाजाला एकत्रित करण्यासाठी त्यांची किती तळमळ आहे हे दिसून येते असो... परंतू यशवंत युवा सेना ही प्रथमता समाजाला स्थान देऊनच कार्य करते त्यामुळे त्या मोर्चासाठी यशवंत युवा सेनेचा पाठिंबा असून धनगर समाजाच्या एकीचा संदेश देणार आहे. परंतू २३ आॅगस्ट च्या मोर्चानंतर जर विद्यापीठ प्रशासनाने अथवा सरकारने जर धनगर समाजाच्या मागण्यांची पुर्तता नाही केली तर यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य च्या वतीने पूर्वनियोजित असलेली पंढरपूर ते सोलापूर विद्यापीठावरील दि.१५ सप्टेंबर २०१७ रोजीची भव्य आक्रमक मोटारसायकल रैली व भव्य मोर्चा नियोजित वेळेप्रमाणेच होणार आहे त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. आणि जरी धनगर समाजाच्या मागण्यांची दखल घेतली तरी सरकारच्या व विद्यापीठ प्रशासन व्यवस्थेच्या अभिनंदनास्तव १५ सप्टेंबर २०१७ रोजी भव्य मोटारसायकल रैली काढण्यात येईल असे प्रतिपादन यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी केले.
सोलापूर विद्यापीठाची प्रशासनव्यवस्था सिनेट हे जातीयवादाचाच बुरखा पांघरून उगाचच अवाजवी दावा करत आहे की जर सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव दिले तर जातीय तेढ वाढेल. मग त्या प्रशासन व्यवस्थेला माझा एक सर्वसामान्य प्रश्न आहे की कोल्हापूर येथील विद्यापीठाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले म्हणून जातीय तेढ वाढली का? पुणे विद्यापीठाचे नामांतरण सावित्रीबाई फुले विद्यापीठ केले म्हणून जातीय तेढ वाढली का? अशा कितीतरी विद्यापीठांना, विमानतळांना, रेल्वे स्थानकांना अनेक महापुरूषांची नावे देण्यात आली आहेत तेव्हा जातीय तेढ निर्माण झाली नाही मग सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव दिल्याने जातीय तेढ कशी काय निर्माण होणार? विद्यापीठ प्रशासनाने सिनेट ने जर आगामी मोर्चात धनगर समाजाच्या मागण्यांची दखल घेतली नाही, सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरणाची अंमलबजावणी केली नाही तर पुर्वनियोजित असलेल्ी १५ सप्टेंबर २०१७ रोजी यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य च्या वतीने पंढरपूर ते सोलापूर विद्यापीठावर भव्य मोटारसायकल रैली काढून त्यापेक्षाही अतिशय उग्र व आक्रमक आंदोलन करून सोलापूर विद्यापीठाला ताळे ठोकायला मागेपुढे पाहणार नाही. १५ सप्टेंबर च्या भव्य मोटारसायकल रैलीला जय मल्हार युवा मंच महाराष्ट्र राज्य चा देखिल पाठिंबा आहे. ही मोटारसायकल रैली व मोर्चा आक्रमक व अतिशय उग्र पद्धतीचा असल्याने त्यानंतर होणाऱ्या नुकसानीस विद्यापीठ प्रशासन व्यवस्था व राज्य सरकार जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे मत यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे यांनी व्यक्त केले.
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+९१७६६६९९४१२३
nitinrajepublications.blogspot.com
Comments
Post a Comment