अहिल्याभक्तांनो आतातरी पेटून उठा


शत्रुंना तलवारीच्या टोकावर तोलणाऱ्या व त्यांच्या छातीवर बसून थय्याथय्या नाचणाऱ्या ज्या राजा समाजात तुम्ही आम्ही जन्माला आलो त्या समाजाचं काहीतरी दायित्व लागतो म्हणून व राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांची आस्मिता जपण्यासाठी त्यांचा वारसा जोपासण्यासाठी आता वेळ आली आहे रस्त्यावर उतरायची आणि जातीयवादी सरकारला ताळ्यावर आणायची लाखोंच्या संख्येने २८ आॅगस्ट २०१७ रोजी सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरण लढाईत सहभागी व्हा. सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव दिले तर कोणाच्या पोटातलं पित्त खवळतंय ते एकदा कळू द्या या महाराष्ट्र राज्याला. मग सांगू त्यांना धनगर समाज काय आहे ते...
हवं तर सांगा त्या पुरोगाम्यांचा बुरखा पांघरलेल्या औलादींना, पुरोहितवाद्यांना/सनातन्यांना की एकतर धनगर समाज कोणाच्या वाट्याला जात नाही आणि जर का कोणी वाट्याला गेला तर त्याच्या वाटेवर जावून त्याची वाट लावल्याशिवाय धनगर समाज आपल्या वाटेवर परत येत नाही हा इतिहास जावून सांगा त्या जातीयवादी भांडवलदारांना.
एक धनगर विराट धनगर
एक धनगर लाख सिकंदर
लाख सिकंदर जरी आले तरी आद्यसम्राट चंद्रगुप्त मोर्यासारखा एक धनगर पुरेसा आहे त्या सिकंदरांना माघारी फिरवण्यासाठी.... एक धनगर हा विराट धनगराप्रमाणे आहे मनात आलं तर क्षणात उध्वस्त करून ते हिसकावून घ्यायची धमक आम्हाला रणधुरंदर, महायोद्धा, आद्यस्वातंत्र्यसैनानी छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांच्याकडून मिळते मग या महाराष्ट्रात राहून जातीयवाद करणाऱ्या त्या कोणत्या औलादी आहेत ते एकदा बघायचं आहे आम्हाला आणि दाखवायचा आहे त्यांना आमचा धनगरी हिसका...
त्यासाठी अहिल्याभक्तांनो आतातरी पेटून उठा आणि पेटवून टाका त्या अन्याय अत्याचार करणाऱ्या औलादींना... जोपर्यंत सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव दिले जात नाही तोपर्यंत ही लढाई थांबवू नका.
सोमवार दि.२८ आॅगस्ट २०१७ स.११:००
चलो सोलापूर चलो सोलापूर चलो सोलापूर
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
     *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
         +९१७६६६९९४१२३
nitinrajepublications.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोलापूर विद्यापीठ नामांतरण लढा यशस्वी, २५-५० लाख धनगरांचा उत्स्फूर्त सहभाग

लवकरच येत आहे सर्व वाचक रसिकांसाठी...

आरक्षण एक घटनादत्त अधिकार