नामांतरण लढ्यात लोखोंच्या संख्येने सहभागी व्हा


ज्या राष्ट्रमातेने जात-पात, धर्म, संप्रदाय, प्रांत, साम्राज्य यापलीकडे जाऊन अखंड भारतभर विकासकामे केली त्यामध्ये केवळ इंदौर राज्याच नव्हे तर काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत व गुजरात पासून आसामपर्यंत बारा जोतिर्लिंगासह १२६७३ मंदिरे राष्ट्रमाता अहिल्याईंनी स्वताच्या खाजगी निधीतून बांधली त्याशिवाय हजारो मशिदी, दर्गे, मजार बांधण्यासाठी त्यांनी मुक्तहस्ताने मदत केली, दानधर्म केला. चारधाम, बारा ज्योतिर्लिंग व ४३ धर्मशाळांना मोठमोठ्या देणग्या दिल्या. राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचा जन्म महाराष्ट्राच्या मातीतच झाला असून एक स्त्री असतानादेखिल  मराठी साम्राज्य सांभाळण्याचे व शत्रुंपासून टिकवण्याचे अबाधित राखण्याचे काम या मायमाऊलीने केले. ऐन दुष्काळात गोरगरिबांसाठी अन्नधान्याचा पुरवठा शिवाय त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला, अनेक विधवांना/निपूत्रीकांना न्याय देऊन त्यांच्यावर लादले गेलेले अन्यायकारक व जाचक कायदे रद्द करणाऱ्या पहिल्या न्यायदेवता, प्रजेला छळणाऱ्यांना शासन करण्यासाठी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी सर्वप्रथमता न्यायालयांची स्थापना केली. आदर्श राज्यकारभार करणाऱ्या व पारदर्शक प्रशासन व्यवस्था चालवणाऱ्या राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचा गौरव "आठराव्या शतकातील जगातील एकमेव उत्तम महिला प्रशासक" असा केला जातो. भारताच्या इतिहासात होळकरांनी अद्वितीय कामगीरी केली त्यास जगात तोंड नाही मग असे असताना सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याईंचे नाव दिल्यावर जातीय तेढ कसा काय वाढेल.? आणि खरंच राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव सोलापूर विद्यापीठाला दिल्यास ज्यांच्या पोटात पित्त खवळतंय, ज्यांच्या पोटात दुखतंय अशा पुरोगाम्यांचा बुरखा पांघरलेल्यांनी/पुरोहितवाद्यांनी/मनुवाद्यांनी अर्थातच सनातनी जातीयवाद्यांनी त्यांची नावे कळवावीत मग त्यांना दाखवतो आमचा धनगरी हिसका काय असतो ते... त्यासाठी धनगर समाजाच्या वतीने दि.२८ आॅगस्ट रोजी भव्य मोर्चा व आंदोलन करण्यात येणार असून लाखो धनगर समाजबांधवांनी धनगर समाजाच्या आस्मितेसाठी नामांतरण लढ्यात/आंदोलनात सहभागी व्हावे.
वार सोमवार
दि.२८ आॅगस्ट २०१७
वेळ स.११:००
सोलापूर येथे लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
     *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
         +९१७६६६९९४१२३
nitinrajepublications.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

धुळे येथे वनरक्षक बनलेत भक्षक, ७ सप्टेंबर ला मोर्चा

सोलापूर विद्यापीठ नामांतरण लढा यशस्वी, २५-५० लाख धनगरांचा उत्स्फूर्त सहभाग

प्रस्तावना : प्राचार्य डॉ शिवाजी दळणर सर