युवकप्रदेशाध्यक्ष टिंग्याने घेतल्या कार्यकर्त्यांच्या भेटी
यवकप्रदेशाध्यक्षांनी घेतल्या कार्यकर्त्यांच्या भेटी
यशवंत युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य युवकप्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रपती पुरस्कार विजेते मा.शरद गोयेकर (टिंग्या) यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन १५ सप्टेंबर २०१७ रोजी पंढरपूर ते सोलापूर विद्यापीठावर होणाऱ्या भव्य मोटारसायकल रैली व मोर्चाच्या संदर्भात रणनीती आखली. मा.शरद गोयेकर हे फिल्म इंडस्ट्रीज मधील एक युवा दिग्दर्शक असून टिंग्या चित्रपटातील त्यांच्या उत्कृष्ट कामगीरीमुळे त्यांना बालवयात माजी राष्ट्रपती मा.सौ.प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.
१५ सप्टेंबर च्या मोटारसायकल रैलीची रणनीती
हाच टिंग्या जेव्हा एक युवा दिग्दर्शक बनून धनगर समाजावर आधारित बब्या चित्रपट बनवतो. समाजाच्या व्यथा जाणून घेतो तेव्हा तो स्वता समाजासाठी ह्रदयातून तीळतीळ तुटू लागतो. पुढे तो निस्वार्थीपणे समाजासाठी झटणाऱ्या व झगडणाऱ्या क्रांतीकारी संघटनेचा अर्थातच यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्यचा हिस्सा बनून फिल्म इंडस्ट्री सांभाळत समाजासाठी अविरत झटू लागतो लढू लागतो त्याचेच जिवंत आणि मुर्तीमंत उदाहरण अहमदनगर जिल्ह्यातील युवकांनी अनुभवले आहेच पण सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यांत देखिल टिंग्याने आपली एक वेगळीच छाप पाडली आहे. फिल्म इंडस्ट्रीज प्रमाणेच यशवंत युवा सेना संघटनेच्या माध्यमातून टिंग्या समाजासाठी कुशल कामगीरी करत आहे. जर सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याईंचे नाव दिले तर जातीय तेढ वाढेल असा अवाजवी दावा अर्थातच अनोखा जावईशोध हा राज्य सरकारचा शिवाय विद्यापीठाच्या प्रशासन व्यवस्थेचा असून त्याच्या निषेधार्थ यशवंत युवा सेना १५ सप्टेंबर २०१७ रोजी भव्य मोटारसायकल रैली व मोर्चा काढणार असून त्यामध्ये राज्यभरातून लाखो धनगर समाजबांधव सहभागी होणार आहेत शिवाय सोलापूर विद्यापीठाला जर राष्ट्र्माता अहिल्याई होळकर यांचे नाव दिले नाही तर यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य ही संघटना सोलापूर विद्यापीठाला टाळे ठोकायला देखिल मागे पुढे पाहणार नाही असा इशारा यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी दिला असून त्यासंदर्भात मोर्चेबांधणी साठी व भव्य मोटारसायकल रैलीच्या बांधणीसाठी यशवंत युवा सेनेचे युवकप्रदेशाध्यक्ष राष्ट्रपती पुरस्कार विजेते मा.गोयेकर यांनी माळशिरस तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या तेव्हा माळशिरस तालुका प्रमुख मा.आबासाहेब बगाडे, नवनिर्वाचित सोलापूर युवक कार्याध्यक्ष मा.बिरा गोरड, यशवंत युवा सेना शाखा भांबुर्डीचे प्रमुख मा.रणजीत वाघमोडे, यशवंत युवा सेनेचे सक्रीय कार्यकर्ते मा.दिपक सरक, आनंदा गारळे तसेच अन्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रपती पुरस्कार विजेते यशवंत युवा सेनेचे युवकप्रदेशाध्यक्ष मा.शरद गोयेकर (टिंग्या) यांचा सत्कार केला.
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+९१७६६६९९४१२३
nitinrajepublications.blogspot.com

Comments
Post a Comment