संगमनेर तालुका प्रमुख पदी योगेश बिडगर यांची निवड


काल दि. १ आॅगस्ट २०१७ रोजी यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्यच्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका प्रमुख या पदावर मा.योगेशजी बिडगर साहेब यांची नियुक्ती करण्यात आली. यशवंत युवा सेना ही एक धनगर समाजाच्या न्याय व हक्कासाठी लढणारी एकमेव क्रांतीकारी संघटना असून वंचितांच्या हक्कासाठी व वंचितांच्या न्यायासाठी लढा उभा करणारी संघटना स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या विचारधारेवर मार्गक्रमण करत आहे. मा.योगेशजी बिडगर हे एक समाजातील निष्ठावंत व समाजासाठी निस्वार्थीपणाने लढणारे झटणारे व झगडणारे युवा कार्यकर्ते आहेत. समाजासाठी निस्वार्थीपणाने कार्य करणाऱ्या समाजबांधवांना यशवंत युवा सेनेच्या माध्यमातून नेतृत्वाची संधी दिली जाते त्यातूनच धनगर समाजाचे नेतृत्व मजबूत व बलशाली बनते त्याचा फायदा हा विधानसभेतील व लोकसभेतील सदस्यांचा टक्का वाढवण्यासाठी होत असतो.
यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांच्या आदेशानुसार यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य चे युवक प्रदेशाध्यक्ष राष्ट्रपती पुरस्कार विजेता युवा दिग्दर्शक मा.शरद गोयेकर (टिंग्या) यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेर तालुका प्रमुख पदी मा.योगेशजी बिडगर यांची निवड करण्यात आली त्याबद्दल यशवंत युवा सेनेचे संगमनेर तालुका प्रमुख मा.योगेशजी बिडगर यांचे हर्दिक हर्दिक अभिनंदन व पुढील समाज कार्यासाठी त्यांना हर्दिक हर्दिक शुभेच्छा.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
शुभेच्छूक,
     *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
         +९१७६६६९९४१२३
nitinrajepublications.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

धुळे येथे वनरक्षक बनलेत भक्षक, ७ सप्टेंबर ला मोर्चा

सोलापूर विद्यापीठ नामांतरण लढा यशस्वी, २५-५० लाख धनगरांचा उत्स्फूर्त सहभाग

प्रस्तावना : प्राचार्य डॉ शिवाजी दळणर सर