यशवंत युवा सेनेने घेतले समाजासाठी एक पाऊल मागे, मोर्चा २८ आॅगस्ट ला


समाजापेक्षा संघटना मोठी नव्हे आणि समाजासाठीच तर संघटना स्थापने केलेल्या असतात. मग समाजाच्या प्रश्नासाठी समाजाबरोबर मार्गक्रमण करणे ही यशवंत युवा सेनेची विचारधारा असून स्व.बी.के.कोकरे साहेबांचे विचार समाजात रुजवण्यास यशवंत युवा सेना सक्षम आहे. सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरासाठी समाजाचे दोन दोन मोर्चे निघणार अशा घोषणा झाल्या होत्या  त्यामुळे धनगर समाजात संभ्रम निर्माण की नक्की कोणत्या मोर्चात सहभागी व्हायचे? जरी दोन्ही मोर्चे निघाले तर धनगर समाजाचेच हसू होईल म्हणून यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य या क्रांतीकारी संघटनेच्यावतीने आयोजित असलेली १५ सप्टेंबर २०१७ ची पुर्वनियोजीत भव्य मोटारसायकल रैली व मोर्चा रद्द करून यशवंत युवा सेना संपूर्ण ताकदीनिशी सोमवार दि.२८ आॅगस्ट रोजी होणाऱ्या मोर्चात सहभागी होणार असल्याचे यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी काल दि.१९ आॅगस्ट रोजी मंगळवेढा जि.सोलापूर येथे झालेल्या धनगर समाजाच्या बैठकीत जाहिर केले.
ज्या राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी जात, धर्म, पंथ, संप्रदाय, साम्राज्य, प्रांत, राज्य यापलीकडे जाऊन अखंड राष्ट्रभर विकासकामे केली, काश्मिरपासून कन्याकुमारी पर्यंत आणि गुजरात पासून आसामपर्यंत १२६७३ मंदिरांचे बांधकाम केले असून हजारो मशिदी, दर्गा  व मजार बांधण्यासाठी मुक्तहस्ताने मोठमोठ्या देणग्या दिल्या शिवाय १२ ज्योतिर्लांगाचा जिर्णोद्धार केला. अशी जातीधर्मापलीकडची कामे अहिल्याईंनी केली असताना सोलापूर विद्यापीठाला जर राष्ट्रमाता अहिल्याईंचे नाव दिले तर जातीय तेढ निर्माण होईल हे विधान जातीयवाद्यांशिवाय दुसरे कोण करू शकतो. त्यामुळे आता आपला असो वा परका जर कोणी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे सोलापूर विद्यापीठास नाव देण्यास विरोध करत असेल त्या जातीयवादी नेत्यांना, प्रशासन व्यवस्थेला धनगरांचा हिसका दाखवायची वेळ आली आहे. लोकप्रतिधीत्व करणारी लोकं जर अशी विधाने/वक्तव्ये करत असतील तर त्यांना त्यांची जागा दाखवायला वेळ लागणार नाही. जोपर्यंत सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव दिले जात नाही तोपर्यंत यशवंत युवा सेना ही कधीच शांत बसणार नाही याची नोंद राज्य सरकार व प्रशासन यांनी घ्यावी व होणाऱ्या परिणामास जबाबदार रहावे असे प्रतिपादन यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी कालच्या बैठकीत व्यक्त केले तेव्हा प्रा.शिवाजीराव बंडगर साहेब, यशवंत युवा सेना सरचिटणीस मा.ॲड.रविकिरण कोळेकर साहेब, यशवंत युवा सेनेचे प्रदेशाध्यक्ष मा.प्रा.सचिन होनमाने सर, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख मा.उमेशराजे अनुसे यांच्यासह मंगळवेढा तसेच सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशवंत युवा सेना ही क्रांतीकारी संघटना नेहमीच समाजासाठी व समाजाच्या बाजूने लढते झगडते शिवाय यशवंत युवा सेना ही काही नुसता दिखाऊपणा करत नाही तर आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या विचाराने निस्वार्थीपणाने समाजासाठी झडत असते झगडत असते. त्यामुळे सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव द्यावे यासाठी सोमवार दि.२८ आॅगस्ट रोजीच्या सोलापूर येथील मोर्चात लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी केले असून यशवंत युवा सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना तसे आदेशही दिले आहेत.
मोर्चाची वेळ
वार सोमवार
दि.२८ आॅगस्ट २०१७
सकाळी ११:०० वाजता
एक धनगर विराट धनगर
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
     *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
         +९१७६६६९९४१२३
nitinrajepublications.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

धुळे येथे वनरक्षक बनलेत भक्षक, ७ सप्टेंबर ला मोर्चा

सोलापूर विद्यापीठ नामांतरण लढा यशस्वी, २५-५० लाख धनगरांचा उत्स्फूर्त सहभाग

प्रस्तावना : प्राचार्य डॉ शिवाजी दळणर सर