एक लढा राष्ट्रमातेसाठी पिवळ्या झेंड्याच्या आस्मितेसाठी
एकेकाळी राजा समाज असलेली जमात आज आपल्या हक्कासाठी लढत आहे झगडत आहे हे सांगायला देखिल लाज वाटते. पण ही वेळ धनगर समाजावर यायला कारणीभूत आहेत ते धनगर समाजातीलच लोकप्रतिनीधी ज्यांना सत्तेची आणि खुर्चीची हाव सुटली आहे. मराठा क्रांती मोर्चात आपले लोकप्रतिनिधी पाणी वाटत बसतात पाठिंबा देतात पण धनगर समाजाचा मोर्चा म्हंटलं की शेपूट घालून कुठे बसतात कोणास ठाऊक? कारण त्यांना लाज वाटतेय धनगर म्हणून घ्यायची पण निवडणूका जवळ आल्या की धनगरांवर गोड गोड भाषणं करायची आणि निवडणूका झाल्या, **खाली पदं आली की समाजाशी माझं काही घेणे देणे नाही असे म्हणत समाजाला शिव्या हासडायला हे बहाद्दर कुठेच कमी पडत नाही. त्यातल्या त्यात धनगर समाजात देखिल संघटितपणा नाही समाजासाठी संघर्ष काय असतो ते २१ जुलै २०१४ च्या बारामतीच्या मोर्चानंतर धनगर समाज स्वता विसरलेला दिसतोय. एवढेच नव्हे तर प्रत्येकाला नेता बनायची हौस वाढल्याचे देखिल दिसून येते मग संघटना काढायची हुकी येते मग संघटनेच्या माध्यमातून थोडीफार ओळख समाजात झाली की गड्याला शिंगे फुटतात विधानपरिषदेची स्वप्नं पडायला लागतात त्याला मंत्री झाल्यासारखंच वाटतं मग ज्यांच्यामुळे हा मोठा झाला त्यांना शिव्या द्यायला गडी मागेपुढे बघतच नाही पण हे जास्त काळ टिकत नसतं, मग ज्यांच्यामुळे हा मोठा झाला ती माणसं याला सोडून जातात. अहंकाराच्या अविर्भावात गडी जास्त हवेत उडायला लागला की हवा कशी काढायची आणि जमिनीवर कसा आपटायचा हे देखिल आम्हाला चांगलेच कळते याचा अनुभव काहीजणांनी घेतलाच आहे म्हणून जरा अशा लोकांनी औकातीमध्येच रहावे अशी माझी त्यांना विनंती आहे.
असो सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव द्यावे यासाठी राज्यपातळीवर धनगर समाजाचा लढा चालू आहे यामध्ये सर्व संघटनांनी एकत्रित यावे व न भूतो ना भविष्य असा लढा द्यावा. सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरण लढ्यात जर तुमच्या संघटना, संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते जर सहभागी होत नसतील तर तुमच्या संघटना काय जाळायला काढल्यात का असे म्हणायला मला वावगे वाटणार नाही. राजकीय पक्षांच्या चपला बाहेरच काढून प्रत्येकांनी सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरण लढ्यात सहभागी व्हा, मग तो आमदार असो खासदार असो मंत्री असो अथवा संत्री असो त्यांनी सोमवार दि. २८ आॅगस्ट च्या मोर्चात सहभागी व्हावे नुसता पाठिंबा देऊन चालणार नाही. समाजामुळेच तुम्ही आमदार आहात, समाजामुळेच तुम्ही खासदार/मंत्री आहात तुमच्यामुळे समाज नाही हा विचार मनातून काढून टाका नाहीतर २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणूका येतीलच त्यावेळी तुमच्याशी आमचा काही संबंध नाही, किंवा तुमच्या मंत्री पदामुळे/खासदारकीमुळे/मंत्रीपदामुळे आजचा धनगर समाज नाही तर धनगर समाजामुळेच तुम्ही आहात असे म्हणायची वेळ तेवढी येवू देऊ नका म्हणजे झालं... धनगर समाजामुळेच (आरक्षणामुळेच) तुम्ही आज डाॅक्टर/इंजिनीअर आहात, कुठे ना कुठे धनगर समाजाच्या आरक्षणाचा वापर करून तुम्ही चांगल्या पदावर आहात, नोकऱ्या करत आहात त्यामुळे धनगर समाजासाठी जर तुम्ही एक दिवस देऊ शकत नसाल तर धनगर समाजाला तुम्ही कलंक आहात. मग तिथे आरक्षणाचा लढा असो अथवा सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरणाचा.... आंदोलन यशस्वी झाले तर ते धनगरांमुळेच आणि अयशस्वी झाले तर तेही तुमच्यामुळेच होईल मग समाजाची इज्जत तुमच्या आमच्या हातात आहे. इज्जतीने ताठ मान करून जगायचे की मान खाली घालून जगायचे हे अगोदर ठरवावं.
सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरणासाठी समाजबांधवांनी पिवळे झेंडे तयार ठेवा भंडारा सोबत घ्या आणि येळकोट येळकोट चा गजर करत सोमवार दि.२८ आॅगस्टच्या विराट मोर्चात सहभागी व्हा.
सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याईंचे नाव विद्यापीठाला दिलेच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात ठेऊनच या लढ्यात उतरा.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
*✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+९१७६६६९९४१२३
nitinrajepublications.blogspot.com

Comments
Post a Comment