षड्यंत्र यशवंत युवा सेनेच्या बदनामीसाठी...

आज २१ व्या शतकात जर कोणी यशाच्या मार्गावर जात असेल अथवा कोणी यश संपादन करत असेल तर कोण कोणाची आणि कशी बदनामी करेल ते सांगता येत नाही. एखाद्याने कितीही चांगले सामाजिक काम करू द्या पण ते चांगले सामाजिक काम जर एखाद्याला बघवले नाही तर चांगले काम करणाऱ्याची बदनामी केल्याशिवाय सोडत नाही मग त्या बदनामी करणाऱ्या  व्यक्तिने चांगले काम करायची गोष्ट तर फारच दूर...
असो यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य ही संघटना ज्या उद्देशाने स्थापन केली त्याची विचारधारा ही क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेबांची असून स्वतंत्र संघटना स्थापन करण्याची काही कारणे देखिल आहेत. ज्या संघटनेत कलंकित वृत्तीची माणसं असतात आणि समाजाच्या डोक्यावर बसून माता बघिणींच्या अभ्रूचे धिंदोडे उडवतात पण अशा प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी घालून संघटना चालवणाऱ्यांपासून कोसो दूर राहण्यासाठी व बदनामी होण्यापासून सुरक्षित राहण्यासाठी आणि कोणताही दिखाऊपणा न करता निस्वार्थीपणाने समाजाच्या न्याय व हक्कासाठी युवकांच्या सर्व ताकदीनिशी यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेची स्थापना केली. परंतू  कलंकित वृत्तीच्या कार्यकर्त्यांना पाठीशी घालणारे काही लोक या समाजात खोटा मुखवटा घालून फिरताहेत आणि चोराच्याच उलट्या बोंबा म्हणाव्यात अशाच बोंबा मारत आमच्याच यशवंत युवा सेनेचे युवक प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रपती पुरस्कार विजेता टिंग्या तसेच युवा दिग्दर्शक मा.शरद गोयेकर यांना फोन करून स्वताच्या संघटनेत घ्यायची भाषा करणे व यशवंत युवा सेनेत बदनामी पासून सावध राहण्याचा सल्ला देणे असा प्रकार घडला. त्या सल्लागाराला माझे सांगणे आहे की अरे यशवंत युवा सेना ही काही तुमच्यासारख्या कलंकिंत वृत्तीच्या कार्यकर्त्यांची संघटना नव्हे, समाजाने मला डोक्यावर घेतलंय असे म्हणत समाजातीलच माता-भगिंनींवर अत्याचार करणाऱ्यांची संघटना नव्हे तर यशवंत युवा सेना ही एक निष्कलंक व निर्मळ चारित्र्य असलेल्या कार्यकर्त्यांची संघटना आहे त्यामुळे बदनामी पासून सावध रहा असे आमच्या यशवंत युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना सल्ला द्यायच्या अगोदर स्वताच्या संघटनेतील कार्यकर्त्यांना तो सल्ला द्या म्हणजे तुमची संघटना मोडकळीस येणार नाही. त्याचप्रमाणे यशवंत युवा सेना संघटनेतील कार्यकर्त्यांना तुमच्या मोडकळीस आलेल्या संघटनेत खेचून घ्यायची वेळ येणार नाही.
काही दिवसांपूर्वीच (मी त्याचे नाव घेण्याइतपत तरी त्याची लायकी नाही) अशा एका महाबहाद्दराने यशवंत युवा सेनेचे युवकप्रदेशाध्यक्ष मा.शरद गोयेकर यांना फोनवरून यशवंत युवा सेनेत बदनामी पासून सावध रहा असे सांगितले आणि कालच एका अनोळखी इसमाने यशवंत युवा सेनेच्या व्हाटसप ग्रुपमध्ये लिंकद्वारे जाॅइन होऊन अश्लील व्हिडीओ क्लिप्स पाठवल्याचे निदर्शनास आले आहे. यशवंत युवा सेनेमध्ये कार्यकर्त्यांचे वर्तन व आचरण पाहूनच त्यांची नियुक्ती केली जाते, कलंकित वृत्तीच्या कार्यकर्त्यांना यशवंत युवा सेनेत कोणताही थारा नाही असे असताना एकीकडून फोनवरून सल्ला देणे व दुसरीकडून यशवंत युवा सेनेच्या ग्रुपमध्ये अश्लील व्हिडीओ पाठवून यशवंत युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना आणि यशवंत युवा सेनेला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. पण त्या संबंधितांना यशवंत युवा सेनेचा एक सच्चा कार्यकर्ता या नात्यानं मी सांगू इच्छितो की यशवंत युवा सेनेचा माध्यमातून धनगर समाजातील युवा वर्ग एकत्रित येत असताना समाजात फूट पाडण्याचे शिवाय यशवंत युवा सेनेला आणि कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र रचू नका नाहीतर समाजासमोर तुम्ही चढवलेला तुमचा खोटा मुखवटा फाडून तुमच्या कर्तृत्वाची अशी कपडे फाडेन की समाजात तोंड दाखवायला देखील जागा उरणार नाही हा एका धनगराच्या पोराचा शब्द आहे.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
     *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
         +९१७६६६९९४१२३
nitinrajepublications.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

धुळे येथे वनरक्षक बनलेत भक्षक, ७ सप्टेंबर ला मोर्चा

सोलापूर विद्यापीठ नामांतरण लढा यशस्वी, २५-५० लाख धनगरांचा उत्स्फूर्त सहभाग

प्रस्तावना : प्राचार्य डॉ शिवाजी दळणर सर