शिकलेल्या त्या पोरास्नी म्हणावं....


शिकलेल्या त्या पोरास्नी म्हणावं,
माघारी जरा फिरून तरी बघ...
आडाणी असलेल्या मायबापाची,
जरा विचारपूस तरी करून बघ...

खूप सोसल्या रे दुखाच्या झळया,
थोडसं जरा आठवून तरी बघ...
सुकलेल्या त्या चेहर्यावरचं,
अश्रू डोळ्यांत साठवून तरी बघ...

तळहाताच्या त्या फोडासारखा,
त्यांनी जपला रं तुला असा अलगद...
नाही कमी पडू दिलं रं गड्या,
पोटाची ती खळगी बडवत...

शिकला पाहिजे आपला पोरगा,
म्हणून चिंतातूर असे मायबाप...
काय म्हणून त्यांस विसरुन जावे,
उगाचि कशाला ओढावतोस रे पाप...

रक्ताचं नातं हाय ते गड्या,
तुला नाय कळायचे सहजासहज...
ज्यावेळी होशील तु कोणाचा बाप,
त्यावेळी तुला येईल रं खरी समज...
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
     *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
         +९१७६६६९९४१२३
nitinrajepublications.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोलापूर विद्यापीठ नामांतरण लढा यशस्वी, २५-५० लाख धनगरांचा उत्स्फूर्त सहभाग

लवकरच येत आहे सर्व वाचक रसिकांसाठी...

आरक्षण एक घटनादत्त अधिकार