त्या माथेफिरू शिक्षकाला निलंबित करा : टिंग्या


धनगर समाजातील माता भगिनींबद्दल सोशल मिडीयावरती अपशब्द वापरून शिक्षकी पेशास काळीमा फासणाऱ्या त्या माथेफिरू शिक्षकाला निलंबित करण्यात यावे अशी मागणी लोकप्रिय अभिनेते राष्ट्रपती पुरस्कार विजेता तथा यशवंत युवा सेनेचे युवकप्रदेशाध्यक्ष मा.शरद गोयेकर उर्फ टिंग्या यांनी केली आहे.
२८ आॅगस्ट रोजी सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरण लढ्यासंदर्भात आयोजित केलेल्या नियोजन बैठकीत ते बोलत होते. सोलापूर राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव दिल्यास सोलापूर विद्यापीठाचा सन्मान होणार आहे परंतू जातीयवादी सरकार जातीय तेढ निर्माण करण्याच्या वल्गना करत असून धनगर समाजाच्या मागणीची दखल घेत नाही. त्यासाठी यशवंत युवा सेना आयोजित असलेला १५ सप्टेंबर चा मोर्चा व मोटारसायकल रैली रद्द करून धनगर समाजाची एकजूट करण्यासाठी यशवंत युवा सेनेच्या वतीन मंगळवेढा येथे दि १८ आॅगस्ट रोजीच घोषणा केली होती. आता निषेध करायचा नाही तर हिशोब करायचा असा नारा देत  २८ आॅगस्ट २०१७ रोजी भव्य मोर्चात सहभागी होणार असल्याचे यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी जाहीर केले होते. त्यानुषंगाने आज अहमदनगर येथे नियोजन बैठक बोलविली होती स्वता यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब या नियोजन बैठकीसाठी उपस्थित होते तेव्हा ज्या माथेफिरू शिक्षकाने धनगर समाजातील माता-भगिनींबद्दल अपशब्द वापरले होते त्याच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला असून लवकरच त्या हरामखोर माथेफिरू शिक्षकाचे निलंबन करण्यात यावे यासाठी अहमदनगर शिक्षणाधिकारी यांना निवेदन देणार असल्याचे यशवंत युवा सेना युवकप्रदेशाध्यक्ष मा.शरद गोयेकर उर्फ टिंग्या यांनी सांगितले. पुढे यशवंत युवा सेना प्रमुख यांनीदेखिल या घटनेचा निषेध करत त्या माथेफिरू शिक्षकास शिक्षा व्हावी यासाठी यशवंत युवा सेना राज्यपातळीवर प्रयत्न करणार असून शिक्षणाधिकाऱ्यांनी जर या मागणीची दखल घेतली नाही तर थेट शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन त्या शिक्षकास निलंबित करण्याची मागणी करणार आहोत असे सांगितले. सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरण संदर्भात बोलताना म्हणाले की यशवंत युवा सेना ही सर्व समाजाची संघटना आहे त्यामुळे समाजावरती होणाऱ्या अन्याय व अत्याचाराच्या विरोधात लढा पुकारून समाजाला न्याय मिळवून देणे हे यशवंत युवा सेनेचे आद्यकर्तव्य आहे. समाजाचे कुठे हसू होऊ नये म्हणून यशवंत युवा सेनेने एक पाऊल मागे घेऊन २८ आॅगस्ट च्या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचे जाहिर केले असून लाखोंच्या संख्येने सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरण लढ्यात सहभागी होण्यासाठी समाजबांधवांना आवाहन केले आहे. त्यावेळी नियोजन बैठकी दरम्याण यशवंत युवा सेनेचे अहमदनगर जिल्हा प्रमुख मा.मयुर कुदवन, मा.कोंडाजी कडनर (अ.नगर युवक कार्याध्यक्ष), नगर सोशल मिडीया प्रमुख मा.नवनाथ वावरे, मा.संपतराव कोळेकर (युवक उपप्रमुख नगर) मा.रंगनाथ कोपनर साहेब (उप जिल्हा प्रमुख नगर), मा.गणेश हाके (कार्याध्यक्ष नगर), मा.वैभव जानकर (संस्थापक सदस्य यशवंत युवा सेना), मा.राजाराम होडगर (जिल्हा संघटक नगर), मा.योगेश बिडगर (संगमनेर युवक प्रमुख), मा.ज्ञानेश्वर ढोणे (संघटक प्रमुख संगमनेर तालुका), मा.विक्रांत ढोणे (युवक उपप्रमुख संगमनेर तालुका), मा.भागचंद्र बिडगर (संघटक संगमनेर), मा.विकास ढोणे (सक्रीय कार्यकर्ते), मा.सत्यवान आचपळे (श्रीरामपूर तालुका उपप्रमुख), मा.अतुल कोळपे (संघटक संगमनेर) तसेच यशवंत युवा सेनेचे अन्य सक्रीय कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यादरम्याण माथेफिरू शिक्षकाचा जाहिर निषेध देखिल करण्यात आला.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
     *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
         +९१७६६६९९४१२३
nitinrajepublications.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

धुळे येथे वनरक्षक बनलेत भक्षक, ७ सप्टेंबर ला मोर्चा

सोलापूर विद्यापीठ नामांतरण लढा यशस्वी, २५-५० लाख धनगरांचा उत्स्फूर्त सहभाग

प्रस्तावना : प्राचार्य डॉ शिवाजी दळणर सर