सोलापूर विद्यापीठावरील मोटारसायकल रैली पूर्वनियोजित -उमेशराजे अनुसे
सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नामकरण करण्यासाठी बाईक रँलीचे नियोजन जुन महिन्यापासून यशवंत युवा सेना करत आहे. जुलै महिन्यात यशवंत युवा सेना बाईक रँली पंढरपूर ते सोलापूर अशी काढणार होती.त्यावेळी पंढरपूर ते बारामती ही रँली धनगर आरक्षण कृती समितीने काढण्याची तारीख जाहीर केली.त्या रँलीला व्यत्यय नको म्हणून यशवंत युवा सेनेने बाईक रँलीचे केलेले नियोजन रद्द करून पंढरपूर ते बारामती या रँलीला पाठिंबा दिला.नंतर या महिन्यात सुरुवातीला ईतर आंदोलने व मोर्चा झाले त्या सर्व कार्यक्रमात यशवंत युवा सेनेच्या बाईक रँलीचा व्यत्यय नको म्हणून नियोजन पुढे ढकलण्यात आले.पण आता मागच्या दोन दिवसांपूर्वी नाशिकचे राष्ट्रवादीचे आ.जयंत पाटील यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना तारांकित प्रश्न अहिल्याबाई होळकर यांचे नाव सोलापूर विद्यापीठाला देण्यासाठी प्रश्न केला तेव्हा विनोद तावडे यांनी सोलापूर विद्यापीठ व्यवस्थापकीय समितीने जातीय तेढ व निकोप विकासाला अढथळा येईल हे कारण पुढे करून नामकरणाला विरोध केल्याचे सांगितले.त्यानंतर यशवंत युवा सेनेने पूर्वनियोजित बाईक रँली काढण्यासाठी केलेला कार्यक्रमाची तारीख पुढील महिन्यात 15 सप्टेंबर ही तारीख जाहीर केली. हा मोर्चाचा लढा फक्त यशवंत युवा सेनेचा नसून माझ्या धनगर समाजातील सर्व धनगर समाज बांधवांचा आहे. तरी या रँली रूपी मोर्चात सर्व धनगर समाजातील वरिष्ठ नेत्यांनी व समाजबांधवांनी व ईतर धनगर समाजातील ईतर संघटनेने रस्त्यावर उतरून सहभागी व्हावे ही नम्र विनंती..
✍🏾 *उमेशराजे अनुसे*✍🏾
यशवंत युवा सेना
पश्चिम महाराष्ट्र प्रमुख
मो नं 9766878717
✍🏾 *उमेशराजे अनुसे*✍🏾
यशवंत युवा सेना
पश्चिम महाराष्ट्र प्रमुख
मो नं 9766878717
Comments
Post a Comment