यशवंत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांमुळे मिळाले पेशंटला जीवनदान


अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुकास्थित असलेल्या जठार हाॅस्पीटल मध्ये ॲडमीट असलेल्या पेशंटचे नातेवाईक श्री डोमाळे यांचा काल दि.१९ आॅगस्ट रोजी यशंवत युवा सेनेचे सोशल मिडीया जिल्हा प्रमुख मा.नवनाथ वावरे साहेब यांना फोन आला व सांगितले  की जठार हाॅस्पीटल येथे ॲडमीट असलेल्या एका वृध्द महिलेला अर्जंट रक्त भरावे लागणार असून एका ब्लड बॅंकची व्यवस्था करावी लागणार आहे तेव्हा क्षणाचाही अवलंब न करता पेशंटचा जीव वाचवण्यासाठी यशवंत युवा सेनेचे सोशल मिडीया जिल्हा प्रमुख मा.नवनाथ वावरे साहेब व यशवंत युवा सेनेचे अहमदनगर जिल्हा युवककार्याध्यक्ष मा.कोंडाजी कडनर यांनी तात्काळ संगमनेर येथील अर्पण ब्लड बॅंक मध्ये जाऊन ब्लड डोनर कार्ड द्वारे पेशंटसाठी एक ब्लड बॅग उपलब्ध करून दिली. सदरची महिला वृद्ध पेशंट ही संगमनेर तालुकास्थित जठार हाॅस्पीटल येथे उपचार घेत आहे.
यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य च्या पदाधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वृद्ध महिला पेशंट यांना वेळेवर रक्त मिळाल्याने जीवनदान मिळाले त्यामुळे यशवंत सैनिकांच्या या उत्तम कामगीरीमुळे सर्व जिल्हाभर त्यांचे कौतुक केले जात असतानाच राष्ट्रपती पुरस्कार विजेता तथा यशंवत युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य युवकप्रदेशाध्यक्ष मा.शरद गोयेकर यांनी देखिल त्या वाघांना शाबासकी दिली असून असेच निस्वार्थीपणाने कार्य करत रहा अशा शुभच्छा दिल्या आहेत अशा यशवंत मावळ्यांस मल्हारबांच्या वाघास पिवळा जय मल्हार.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
     *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
         +९१७६६६९९४१२३
nitinrajepublications.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

धुळे येथे वनरक्षक बनलेत भक्षक, ७ सप्टेंबर ला मोर्चा

सोलापूर विद्यापीठ नामांतरण लढा यशस्वी, २५-५० लाख धनगरांचा उत्स्फूर्त सहभाग

प्रस्तावना : प्राचार्य डॉ शिवाजी दळणर सर