यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य या क्रांतीकारी संघटनेच्या सांगली जिल्हा उपप्रमुख या पदावर इस्लामपूरच्या (वाळवा) मा.सागर (दादा) मलगुंडे यांची निवड करण्यात आली आहे. मा.सागर मलगुंडे यांना यशवंत युवा सेनेचे सरचिटणीस ॲड.रविकिरण कोळेकर साहेब यांनी निवडीचे पत्र दिले असून समाजकार्य करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत. मा.सागर (दादा) मलगुंडे यांची निवड केल्याने वाळवा तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील युवा वर्गास आनंदाचे वातावरण आहे.

यशवंत युवा सेना ही संघटना स्व.बी.के.कोकरे साहेब यांच्या विचारधारेवरती मार्गक्रमण करत असून स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या विचारांचे वारसदार तथा यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही संघटनेची घोडदौड सुरू आहे. यशवंत युवा सेनेने निस्वार्थीपणाने कार्य करत असलेल्या सक्रीय कार्यकर्त्यांची निवड करून समाजासाठी झटणाऱ्या झगडणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय दिला आहे त्यामुळे यशवंत युवा सेना संघटनेच्या माध्यमातून समाजासाठी अविरत कार्य करणार असल्याचे प्रतिपादन यशवंत युवा सेनेचे नवनिर्वाचित सांगली जिल्हा उपप्रमुख मा.सागर (दादा) मलगुंडे यांनी केले असून युवकांनी समाजाकार्यासाठी हातभार लावावा असेही त्यांनी सांगितले.
त्यांच्या या निवडीवेळी यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब, यशवंत युवा सेनेचे सरचिटणीस ॲड.रविकिरण कोळेकर साहेब, सांगली जिल्हा प्रमुख मा.पै.रूपनर साहेब तसेच असंख्य कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते. नवनिर्वाचित यशवंत युवा सेना सांगली जिल्हा उपप्रमुख मा.सागर (दादा) मलगुंडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे हर्दिक हर्दिक अभिनंदन व त्यांच्या पुढील सामाजिक कार्यास लाख लाख शुभेच्छा.
💐💐💐💐💐💐💐
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत।।
शुभेच्छूक,
*✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+९१७६६६९९४१२३
nitinrajepublications.blogspot.com
Comments
Post a Comment