तेव्हाच माझ्या राष्ट्रमातेला खरे अभिवादन असेल
माता अहिल्ये तुझी जगभर कीर्ती
तूच होतीस महान प्रशासनकर्ती
माते तुझी घेऊनिया स्फूर्ति
लढण्यासाठी घेऊन तलवार हाती
आम्हीही उतरतो आता रणांगणावरती.....
एक स्त्री असूनदेखिल या देशाच्या विशाल भूभागावर जवळजवळ २८ वर्ष राज्यकारभार करणारी महाक्रांतीकारी राज्यकर्ती, १८व्या शतकातील जगातील एकमेव आदर्श आणि महान प्रशासक असा उल्लेख अक्षरशा ब्रिटिशांनी करून ठेवला आहे अशा विश्वरत्नरूपी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचा आज स्मृतीदिन त्यानिमीत्ताने राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे जिवनकार्य नमुद करून महाराष्ट्र राज्यातील जनतेला इतिहासाची जाण करून द्यावी यासाठी केलेला लेखप्रपंच....
आपल्या राज्यातील प्रजेलाच नव्हे तर अखंड भारतातील प्रजेला पोटच्या लेकरांप्रमाने सांभाळणारी मायमाऊली, एवढेच नव्हे तर जाती-धर्माच्या भींती तोडून स्वताच्या मुलीचा आंतरजातीय विवाह करून समाजासमोर आदर्श ठेवणारी थोर समाजसुधारक, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मंदिरांचा जिर्णोध्दार, मंदिरांचे बांधकाम, मश्चिदींचे बांधकाम, शेतकऱ्यांसाठी शेततळे, तलाव, विहीरी, वाटसरूंसाठी बारवे, धर्मशाला, नदीवरील घाट अशी कीतीतरी विकासकामे प्रजेच्या हीतासाठी करणारी पुण्यश्लोक, वेळप्रसंगी प्रजेच्या रक्षणासाठी हाती तलवार भाले घेऊन दुश्मनांच्या चिंधड्या उडवण्यासाठी शत्रुंना खुलेआम आवाहन करणारी एक रणरागीणी, राजमाता, महाराणी, लोककल्याणकारी माता अहिल्याई होळकर यांचा आज २२२ वा स्मृतिदीन त्यानिमीत्त माझ्या राजमातेला मानाचा पिवळा जय मल्हार.
जाती धर्माच्या पलिकडे जाऊन प्रजाहितरक्षणासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या अहिल्याई होळकर यांची जयंती आणि स्मृतिदीन हे फक्त धनगर समाजानेच साजरा करणे हा खरंतर राष्ट्रमाता अहिल्याईंचा अपवान आहे पण जातीवादाने बरबटलेल्या या महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर अखंड भारत देशांतर्गत ही जातीवादाची अन् भूरसटलेल्या विचाराची पेरण करून सनातन्यांनी सर्वसामान्यांचे पार कंबरडच मोडलंय. राजमाता अहिल्याई होळकर असो अथवा अन्य कोणी थोर महापुरूष किंवा समाजसुधारक असो यांची जयंती अथवा स्मृतिदीन साजरा करणे ही सर्वांची नैतिक जबाबदारी असताना त्या त्या महापुरूषांचे विचार आत्मसात करून त्या मार्गावर चालणे हे समाजाच्या हीताचे आहे. नुसतंच महापुरूषांच्या जयंत्या/स्मृतिदीन साजरा करणं, लोकवर्गणीतून हजारो-लाखो रुपये उधळून डी जे लावून धांगडधींगा हे समाजजागृतीचे लक्षण नसून समाजाला त्या महापुरूषांच्या विचारांपासून परावर्तित करण्याचे लक्षण आहे असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही.
राष्ट्रमाता महाराणी अहिल्याई होळकर यांची प्रशासन पद्धत पाहून, राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचा राज्यकारभार आणि प्रशासन व्यवस्था याचा अभ्यास करून युरोप खंडांतील देशांनी विकासाचा पल्ला गाठला, शेती, शिक्षण तसेच औद्योगिकरणातून त्या त्या देशांनी आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात प्रगती केली पण त्याच राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचा भारत देश मात्र अधोगतीच्या मार्गावर आहे यासाठी धर्मनिरपेक्षतेचा उगाच आव आणणाऱ्या भारत देशाची जातीव्यवस्था ही भारताच्या अधोगतीशी कारणीभूत आहे. आजपर्यंत सनातन्यांनी राष्ट्राप्रति सर्वस्व अर्पन करणाऱ्या महापुरूषांचा इतिहास चुकीचाच लिहला आणि खरा इतिहास मात्र दडवून ठेवला/लपवून ठेवला कारण की चुकीचा इतिहास लिहणारे इतिहासकार खरोखरच चुकीचे जन्माला आले होते.
आज धनगर समाज जागा झाला, समाजाला खरा इतिहास समजू लागला उमजू लागला पण समाजाचे भांडवलीकरण करून, समाजाला प्रस्तापितांच्या दावणीला बांधायचे काम धनगर समाजातील नेत्यांनी केले म्हणजेच धनगर हा आगीतून फुफाट्यात पडला हीच अवस्था धनगर समाजाची झाली आहे. अरे एकेकाळी राजा समाज असणारी ही जमात आज गुलामगीरीत का वागतेय? हे सांगून सांगून थकलो तरीही धनगर समाज अजून अज्ञानाचं, अंधश्रद्धेचं घोंगडं पांघरून गाढ निद्रावस्थेत गाढ झोपी गेलाय हे समाजाचे सर्वात मोठे दुर्दैव आणि याच कारणांमुळे धनगर समाजाचा विकास खुंटलाय असं म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही.
असो आजचा युवक शिकलाय, सवरलाय, अन्यायाच्या विरोधात लिहायला, वाचायला आणि बोलायला लागलाय त्यामुळे कुठूनतरी आशेचा किरण उगवलेला दिसतोय, कुठूनतरी समाजप्रबोधनास नव अंकुर फुटलेला दिसतोय. आजचा युवक स्वाभिमानाची भाषा बोलायला लागलाय. नक्कीच आजचा यूवक हा उद्याच्या भावी पिढीसाठी एक नवा इतिहास रचून जाईल. एक वेळ अशीही येईल की राजा मल्हारराव होळकर यांचे "मल्हारतंत्र" अवगत करून, रणरागीणी अहिल्याई होळकर यांचा आदर्श आणि एकमेव अद्वितीय महाराजा यशवंतराव होळकर यांची दूरदृष्टी डोळ्यांसमोर ठेऊन सर्व धनगर समाजबांधव, नेते एकत्रित येऊन क्रांती घडवतील हीच आशा मनी बाळगून समाजप्रबोधनासाठी चालू केलेला हा लेखनप्रपंच असाच चालू राहील.
पुनःश्च एकदा राष्ट्रमाता,राजमाता पुण्यश्लोक अहिल्याई होळकर यांच्या २२२ व्या स्मृतिदीनानिमीत्त (१३ आॅगस्ट १७९५) त्यांच्या प्रेरणादायी सक्षम विचारांना व समाज उध्दारक दैदिप्यमान कार्याला विनम्र अभिवादन...! मानाचा पिवळा जय मल्हार!! तसेच या स्मृतिदीनानिमीत्त माझ्या राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांना त्रिवार अभिवादन कोटी कोटी प्रणाम.
आजच खरी शपथ घ्या...
राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांना जर खरंच अभिवादन करायचे असेल तर सर्व समाजबांधवांनी दि. १५ सप्टेंबर २०१७ रोजी धनगर समाजाच्या वतीने यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य व जय मल्हार मल्हार युवा मंच महाराष्ट्र राज्य आयोजित सोलापूर विद्यापीठावर होणाऱ्या भव्य मोटारसायकल रैली व मोर्चात सहभागी व्हा व जोपर्यंत सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव दिले जात नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील. माझ्या राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांना खरी श्रद्धांजली अभिवादन तेव्हाच मिळेल जेव्हा आपल्या सर्वांच्या एकीतून लढ्यातून सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याईंचे नाव सन्मानाने मिळेल.
आपल्यातीलच एक सच्चा धनगर
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
*✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+९१७६६६९९४१२३
nitinrajepublications.blogspot.com
Comments
Post a Comment